घरातच सुरु केला देहव्यापाराचा अड्डा

पाेलिसांचा छापा : तीन युवतींना घेतले ताब्यात

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
prostitution-started-in-the-house : वस्तीतील काही गरीब तरुणींना झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून चक्क देहव्यापार करण्यात भाग पाडण्यात येत हाेते. देहव्यापारासाठी एका महिलेने स्वतःच्या घराचा वापर केला तर आंबटशाैकीन ग्राहकांचा शाेध घेण्यासाठी तिने तिच्या मित्राला जबाबदारी दिली हाेती. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या या देहव्यापाराच्या अड्ड्यावर पाेलिसांनी छापा घातला. या छाप्यात घरात तीन तरुणींना देहव्यापार करताना ताब्यात घेण्यात आले. तर महिला व तिच्या मित्राला अटक करण्यात आली. नेहा उफर् पूजा रामप्रसाद शाहु (45) असे अटकेतील महिला दलालाचे नाव आहे तर तिचा मित्र वैभव द्विवेदी (गुलमाेहरनगर) याचा पाेलिस शाेध घेत आहेत.
 
 
NGP
 
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवारी रात्री पारडी पाेलिस ठाणे हद्दीतील प्लाॅट नंबर 73, भवानीनगर नाल्याजवळ राहणाèया नेहा शाहु हिच्या घरात छापा टाकला. छाप्यात नेहा ही तीन युवतींकडून देहव्यवसाय करून घेताना आढळली. कारवाईत पाेलिसांनी तिनही पीडित युवतींची सुटका करीत नेहाला ताब्यात घेतले. नेहा ही तिचा साथिदार वैभव द्विवेदी याच्यासाेबत मिळून मुलींना आंबटशाैकीन ग्राहकांशी संबंध ठेवण्यासाठी पैसे देत हाेती. मुलींना देहव्यवसायाच्या दलदलीत ढकलून घरीच ग्राहकांना जागा उपलब्घ करून देत हाेती. दरम्यान, कारवाईत पाेलिसांनी आराेपीच्या ताब्यातून 2 हजारांची राेकड, एक ाेन असा 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त मुद्देमालासह आराेपीला पारडी पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले.