डॉ. पं. कृ विद्यापीठाच्या कार्यकारी सदस्य पदी राम ठाकरे यांची नियुक्ती

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
मंगरूळनाथ,
Ram Thackeray appointed कासोळा येथील रामठाकरे यांची डॉ. पं. कृ. विद्यापीठाची प्रशासकीय आणि धोरणात्मक कामे सुरळीत व्हावी यासाठी विद्यापीठाच्या कार्यकारी परीषदेवर कृषी विभाग महाराष्ट्र राज्य सचिवालया अंतर्गत सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारी परिषद ही विद्यापीठाची एक महत्त्वाची प्रशासकीय संस्था असते, जी विद्यापीठाच्या सर्व धोरणात्मक बाबींवर निर्णय घेते. या परिषदेमध्ये कुलगुरू, विद्यापीठाशी संबंधित व्यक्ती लोकप्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात. विद्यापीठाचे महत्त्व म्हणजे हे विद्यापीठ विदर्भात कृषी शिक्षणाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.
 
 
 
Ram Thackeray appointed
 
या विद्यापीठातून कृषी क्षेत्रातील नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाचा विकास करण्यात येतो. शेतीची उत्पादनक्षमता वाढेल. त्याच प्रमाणे या विद्यापीठातुन शेतकर्‍यांना कृषी क्षेत्रातील नवीन ज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल माहिती देण्याचे काम करण्यात येते. विद्यापीठाचे महत्त्व म्हणजे हे विद्यापीठ विदर्भात कृषी शिक्षणाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. या विद्यापीठाला देशातील सर्वोत्तम कृषी विद्यापीठांपैकी एक म्हणुनही स्थान मिळाले आहे.त्यामुळे राम पाटील ठाकरे यांच्या निवडीने मंगरूळनाथ तालुयासह वाशीम जिल्ह्याच्या शेतीला आधुनिकतेची जोड लागणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मंगरूळनाथ येथे माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी स्वागत केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, बाजार समितीचे उपसभापती राजकुमार गावंडे, भास्कर पाटील, पांडुरंग कोठाळे, आर. के. राठोड, चंद्रकांत पाकधने, गोविंद वर्मा, निलेश जीवनानी, विशाल सोमटकर, विजय ठाकरे, श्याम देवळे, विठ्ठल काळपांडे यांची उपस्थिती होती.