नागपूर,
लक्ष्मीनगर
Samuhik tulsi vivah दैनिक तरुण भारत तर्फे करण्यात आलेल्या सामूहिक तुळशी विवाहाच्या आवाहनानुसार लक्ष्मीनगर येथील श्री सिद्ध गणेश मंदिर, बुटी लेआऊट येथे बुधवार, दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता गोरज मुहूर्तावर तुळशी विवाहाचा सोहळा अत्यंत थाटामाटात, वाजतगाजत आणि उत्साहात संपन्न झाला.एकंदरीत, या वर्षीचा तुळशी विवाह सोहळा अतिशय उत्साहवर्धक आणि आनंदमय झाला. भारतीय संस्कृतीची ओळख नवीन पिढीपर्यंत पोहोचावी, या हेतूने अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत राहावे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सौजन्य :अंजली साठे, संपर्क मित्र
गजानन नगर
परिसरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात प्रसन्न वातावरणात, मंगल आरत्या आणि आनंदमय वातावरणात तुळशी विवाह सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. Samuhik tulsi vivahदैनिक तरुण भारत यांच्या सहकार्याने तसेच मंदिरातील महिला वर्ग आणि वस्तीतील नागरिकांच्या सहभागाने हा कार्यक्रम थाटात पार पडला.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून उपस्थित सर्वांनी तुळशी विवाहाच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीचे सौंदर्य अनुभवले.
सौजन्य : सुहास खरे संपर्क मित्र
नरेंद्र नगर
सिद्धिविनायक गणेश मंदिर, पी. एम. जी. वसाहत, नरेंद्र नगर येथे तुळशी विवाह सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला. पवित्र गोरज मुहूर्तावर पारंपरिक विधी, मंगलाष्टके आणि आरत्यांच्या गजरात हा सोहळा पार पडला.मंदिरातील पुजाऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने विवाहविधी पार पाडला. Samuhik tulsi vivahमहिला भक्तांनी नटूनथटून सहभाग घेतला, तर पुरुषांनी पारंपरिक मंगलवेशात उपस्थिती लावली. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सौजन्य :संजय श्रौती, संपर्क मित्र