हिंगणघाट, sudhir kothari : आपल्या वैचारिक प्रबोधनाची शंभर वर्षे यशस्वीपणे पूर्ण करताना शताब्दी काळात पर्यावरणाचे भान जनतेत असावे यासाठी सुरू केलेले विविध उपक्रम समाजस्वास्थाच्या दृष्टीने अतिशय आवश्यक असून या समाजहितैशी असल्याचे ज्येष्ठ सहकार नेते अॅड. सुधीर कोठारी यांनी व्यत केले.
स्थानिक रिठे कॉलनी येथील श्री हनुमान मंदिरात तरुण भारतच्या सामूहिक तुळशी विवाह समारंभात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी नपचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ कापसे, माजी नगरसेवक बंटी वाघमारे, तभाचे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल व्यास, तालुका प्रतिनिधी सतिश वखरे, बाजार समितीचे सचिव टी. सी. चांभारे, खरेदी विक्रीचे संचालक तेजस तडस उपस्थित होते.
यावेळी तालुका प्रतिनिधी सतिश वखरे यांनी तरुण भारताने शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने तभाद्वारे पर्यावरण जनजागृती संदर्भात आजवर राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली.
संचालन श्रीधर घोडमारे यांनी केले. आभार तुकाराम चांभारे यांनी मानले. या तुळशीविवाहाला रिठे कॉलनी परिसरातील प्रचंड प्रमाणावर स्त्री पुरुष उपस्थित होते. रिठे कॉलनीतील हनुमान मंदिरात परंपरेप्रमाणे तुळशी विवाह साजरा करण्यात आला.
यशस्वीतेकरिता विजू ईजकुलवार, नारायण पोहाणे, नारायण कळमकर, राजू घुगरे, सुदाम भोयर, केशव वानखेडे, आदींनी परिश्रम घेतले.