आमदाराने शासकीय कामाचे अनधिकृत केले भूमिपूजन

अशोक डेरे यांनी केले आरोप : कायदेशीर कारवाई करण्याची केली मागणी

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
ashok-dere : यवतमाळ विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी नेताजीनगर येथील सुभाषचंद्र बोस फोटो ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रस्त्याचे गिट्टीकरण व डांबरीकरण नेताजीनगर प्रभाग क्रमांक 10 येथे शासकीय कामाचे अवैध अनधिकृत भूमिपूजन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अशोक डेरे व विक्की नाडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
 
 

y6Nov-Ashok-Dere 
 
 
 
पुढे बोलताना अशोक डेरे म्हणाले, हे काम साहित्यरत्न लोकशाहीर अन्नाभाऊ साठे दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर झालेले आहे. या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी किंवा कार्यालयीन आदेश नसताना आमदाराने अवैध आणि अनाधिकृतपणे भूमिपूजन समारंभ आयोजन केला.
 
 
या भूमिपूजनाच्या वेळी सुभाषचंद्र बोस फोटोजवळ फलक लावून फलकाचे अनावरण केले व तेथे 40-50 नागरिक उपस्थित होते. हे कृत्य शासकीय नियमाचे उल्लंघन आहे. तसेच होऊ घातलेल्या निवडणुकीच्या कार्यकाळात प्रभावी करण्यासाठी दिशाभूल करुन खोटे भूमिपूजन केले आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.