लाखनी येथे वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव!

वर्षभर चालणार विविध उपक्रम

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
​लाखनी,
Vande Mataram Centenary Festival in Lakhneet राष्ट्रगीत 'वंदे मातरम'ला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लाखनी येथे 'वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. लाखनी तालुका समितीच्या वतीने आयोजित हा महोत्सव ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता लाखनी येथील क्रीडा संकुल, समर्थ ग्राउंड येथे उत्साहात सुरू होणार आहे. ​हा महोत्सव केवळ एक दिवसाचा नसून, तो संपूर्ण वर्षभर ४ टप्प्यांत पार पडणार आहे. होत्सवाचा आरंभ समारंभ ७ नोव्हेंबरला सामूहिक वंदेमातरम या गीताने होणार असून, माननीय तहसीलदार श्रीमती शितल घावटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होईल.

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो 
यावेळी प्रमुख वक्ते दत्ताजी केळकर, गटविकास अधिकारी संदीप पानतावने,गटशिक्षणाधिरी सुभाष बावनकुळे,पोलीस निरीक्षक सुभाषजी बारसे,आयटीआय गटनिर्देशक प्रशांत बेतावर आणि सहाय्यक आयुक्त, कौशल विकास अमित मलोडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. ​प्रथम टप्प्यात भव्य गीतगायन आणि स्पर्धा: महोत्सवाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात ७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार असून, याच दिवशी महाराष्ट्रातील ३५८ तालुक्यांमध्ये एकाच वेळी 'वंदे मातरम' गीताचे गायन होणार आहे. यानंतर ७ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या
आठवड्यात तालुका स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गीत गायन, देशभक्तीपर भाषणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. ​पुढील टप्पे: ​दुसरा टप्पा: १९ जानेवारी ते २६ जानेवारी २०२६ ​तिसरा टप्पा: ७ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६ ​चौथा टप्पा: १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२६ ​शासनाच्या निर्णयानुसार पुढील टप्प्यांमध्येही विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जातील. ​लाखनी तालुका समितीने सर्व नागरिकांना, विद्यार्थी, शिक्षक आणि देशभक्तांना या ऐतिहासिक महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आणि वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांना सक्रिय पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. ​