नंदगवळी संघटनेकडून अंकिता डोळेच्या पालकांचा सत्कार

    दिनांक :07-Nov-2025
Total Views |
यवतमाळ, 
Ankita Dole's parents felicitated गवळी समाजातील अंकिता सुधाकर डोळे हिने अत्यंत कठीण सनदी परीक्षेत उत्तीर्ण होऊन समाजाचा मान अभिमानाने उंचावला आहे. विशेष म्हणजे, ती गवळी समाजातील पहिली सनदी लेखापाल ठरली आहे. या अभूतपूर्व यशामुळे सर्वत्र आनंद आणि अभिमानाची लाट पसरली आहे. तिचा राष्ट्रीय नंदगवळी समाज संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
 
 
Ankita
 
Ankita Dole's parents felicitated अंकिताचे हे यश तिच्या कुटुंबासाठी, गावासाठी आणि संपूर्ण गवळी समाजासाठी मानाचा ठरले आहे. याच अनुषंगाने तहसीलदार बिजवे, बाळासाहेब डोळे, पंडितराव बोपटे, रमेश झामरे, किसन बोपटे, सुभाष कालोकार, सुभाष काकडे, चंद्रपाल कालोकार, राजू घाटोळ, अमोल झांबरे, अक्षय साठे, सुधाकर डोळे, राजू घाटोळ, सुरेंद्र वासनिक, पवन झामरे, ज्ञानेश्वर अवथळे, राजू भोंगाडे, ओंकार चेके इत्यादी प्रामु‘याने उपस्थित होते.