काळीदौलत,
गंभीर आजाराचे दुखणे कमी करण्याच्या नावावर गावखेड्यात बस्तान बसवलेल्या ‘झोला छाप’ उच्च पॉवरच्या पेनकिलर गोळ्या देण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांना किडनीसारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे अनेकांना आपला जीव गमवण्याची शक्यता नाकारता येत नाही. bogus doctor बोगस बंगाली डॉक्टरांवर त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे.
या ग्रामीण भागात संधीचा फायदा घेत गावखेड्यातील भोळ्या-भाबड्या अशिक्षित रुग्णांना गंभीर आजारावर तत्काळ आराम व वेदना करण्याचे आमिष दाखवून bogus doctor बोगस डॉक्टर जादा प्रमाणात व उच्च पॉवरची औषधे, बेसुमार व अनियंत्रितपणे उपचार करीत आहेत. या बोगस डॉक्टरांच्या उपचाराने रुग्णांचे दुखणे कमी होत आहे. परंतु कालांतराने या डॉक्टरांनी केलेल्या औषधोपचाराने रुग्णांना किडनीसारखा आजार जडून मृत्यू आपल्या कवेत घेत असल्यासारखे आहे. या झोला छाप डॉक्टरांवर कार्यवाही होणे फार आहे.
या अवैध bogus doctor बोगस डॉक्टरांची गेल्या काही वर्षांपासून चांगलीच दुकानदारी सुरू आहे. त्या बोगस डॉक्टरांवर कार्यवाही होत नसल्याने त्यांचे चांगलेच जमत आहे. ग्रामीण भागात बर्याच बोगस डॉक्टरांनी आपली दुकानदारी सुरु केली आहे. परिसरातील काही बोगस डॉक्टरांनी तर रुग्णांना फक्त औषधी लिहून देण्यापर्यंतच आपली प्रॅक्टीक्स सुरू न ठेवता त्यांनी आपल्या रुग्णांना भरती करून त्यांना सलाईन सुध्दा लावणे सुरू केले आहे. त्यामुळे या झोला छाप डॉक्टरांवर कार्यवाही होणार का, अशी चर्चा होत आहे.