संदीप राचर्लावार
सिरोंचा,
chief-minister-fadnavis-in-sironcha सिरोंचा तालुक्याच्या विकासाच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान लिहिले जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आठ वर्षांच्या अंतराने पुन्हा सिरोंचाच्या भूमीवर येत आहेत. सिरोंचात उभारण्यात येणार्या मेडिकल हब आणि इंजिनिअरिंग हबच्या भूमिपूजनासाठी ते येत आहेत. या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुका केवळ सीमाभाग म्हणून ओळखला जाणार नाही, तर शिक्षण, आरोग्य आणि औद्योगिक प्रगतीचा नवा केंद्रबिंदू म्हणून उदयास येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सन 2017 मध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी सिरोंचाला भेट देत गोदावरी नदीवरील बहुप्रतीक्षित पुलाचे उद्घाटन केले होते. या पुलामुळे सीमाभागातील नागरिकांना महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या तिन्ही राज्यांतील संपर्काचे दार खुले झाले. chief-minister-fadnavis-in-sironcha सिरोंचाच्या विकासाचा प्रवास त्या पुलाच्या उद्घाटनानेच प्रत्यक्षात सुरू झाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सिरोंचा हा सीमाभाग राहणार नाही, तो विकासाचा मार्ग दाखवणारा भाग बनेल, असे आश्वासन त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. आज त्या विधानाला मूर्त रूप मिळवून देण्यासाठीच ते पुन्हा सिरोंचाला येत आहेत.
गोदावरी पुलानंतर सिरोंचाच्या नागरिकांचे जीवनमान बदलले. वाहतूक, व्यापार आणि शैक्षणिक सुविधा वाढल्या. हैद्राबाद, करीमनगर आणि नागपूर या शहरांशी थेट दळणवळण सुरू झाल्याने व्यवसायिकांना नवी उभारी मिळाली. याच पुलाच्या माध्यमातून सिरोंचाचा सीमाभाग संभावनांचा प्रदेश बनला. त्या काळात फडणवीस सरकारने सिरोंचा-हैद्राबाद बससेवा सुरू करून ग्रामीण भागातील प्रवास सुलभ केला. तसेच वीज आणि पाणीपुरवठ्याच्या योजना राबवून मूलभूत सुविधांचा पाया मजबूत केला.
आता आठ वर्षांनंतर तेच मुख्यमंत्री पुन्हा सिरोंचाला येत आहेत. आणि यावेळी त्यांचा दौरा अधिक व्यापक आणि परिवर्तनशील आहे. कारण मेडिकल हब आणि इंजिनिअरिंग हबच्या भूमिपूजनामुळे सिरोंचाच्या शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात क्रांती होणार आहे. chief-minister-fadnavis-in-sironcha या प्रकल्पांतर्गत मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, हॉस्पिटल कॉम्प्लेक्स, तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र आणि संशोधन प्रयोगशाळा उभारण्याची योजना आहे. या माध्यमातून सिरोंचाच्या युवकांना मोठ्या शहरांमध्ये धाव घेण्याची गरज राहणार नाही. उच्च शिक्षण, तांत्रिक प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी घराजवळच उपलब्ध होतील.
एकेकाळी दुर्लक्षित, सीमाभाग म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश आता प्रगतीचे केंद्र बनत आहे. गोदावरी पुलाने सिरोंचाला जगाशी जोडले, आणि आता मेडिकल व इंजिनिअरिंग हब त्याला नवीन ओळख देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, सिरोंचाच्या विकासयुगाची औपचारिक सुरुवात ठरणार आहे. ही भावना आज प्रत्येक नागरिकाच्या मनात ठळकपणे उमटली आहे.