डॉ. अनिल आखरे यांची आरोग्य भारती जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड

    दिनांक :07-Nov-2025
Total Views |
आरोग्य भारतीचे धन्वंतरी पूजन आणि डॉ. अनिल पटेल यांचा सत्कार
यवतमाळ, 
Dhanvantari Puja of Arogya Bharati यवतमाळ जिल्हा आरोग्य भारतीच्या वतीने धन्वंतरी पूजनाचा कार्यक‘म केमिस्ट भवन येथे झाला. याच कार्यक‘मात आरोग्य भारतीचे विदर्भ प्रांतसचिव डॉ. प्रसाद बनसोड यांनी डॉ. आखरे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड केली. कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी दीनदयाल प्रबोधिनीचे अध्यक्ष नरहर देव, ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. अनिल पटेल, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दीपक शिरभाते आरोग्य भारती जिल्हाध्यक्ष डॉ प्रशांत कसारे, आरोग्य भारती जिल्हा सचिव डॉ. अनिल आखरे हे मंचावर उपस्थित होते.
 
 
Patel
 
या कार्यक‘माची सुरुवात Dhanvantari Puja of Arogya Bharati धन्वंतरी पूजन व धन्वंतरी स्तवनाने यावेळी आरोग्य भारतीच्या स्थापनेपासूनची माहिती, संघ शताब्दी, पंचपरिवर्तन, कुटुंब प्रबोधन, मानसिक स्वास्थ्य, पर्यावरण या संदर्भातील माहिती प्रास्ताविकामधून डॉ. अनिल आखरे यांनी दिली. डॉ. प्रसाद बनसोड यांनी सत्कारमुर्ती डॉ. अनिल पटेल यांचा विस्तृत परिचय करून दिला. यावेळी सत्कारमुर्ती यांना देण्यात येणार्‍या मानपत्राचे वाचन डॉ. अनुजा बनसोड यांनी केले. कार्यक‘माचे अध्यक्ष देव तसेच मंचावरील उपस्थित मान्यवरांनी डॉ. अनिल पटेल यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना डॉ. अनिल पटेल यांनी सामाजिक सेवेचा व संस्काराचा वारसा त्यांच्या आई वडिलांकडून आल्याचे सांगितले. सत्कार केल्याबद्दल आरोग्य भारतीचे आभार मानले. कार्यक‘माचे अध्यक्ष नरहर देव यांंनी आरोग्य भारती करीत उपक‘माबद्दल प्रशंसा केली.
 
 
Dhanvantari Puja of Arogya Bharati  या कार्यक‘मात डॉ. आशिष तावडे, डॉ. अमोल देशपांडे व डॉ. महेश चव्हाण यांनी कार्यक‘माचे अध्यक्ष नरहर देव यांचा सत्कार केला. तसेच बसवेश्वर आणि अयोध्या नगर प्रभात शाखेच्या स्वयंसेवकांनी डॉ. अनिल पटेल यांचा सत्कार केला. कार्यक‘माला जीवन पाटील, विलास देशमुख, धनंजय पाचघरे डॉ. विनोद भोंगाडे, अर्जुन खर्चे, दंडे, प्रदीप खराटे यांची उपस्थिती होती. कार्यक‘माचे संचालन गजानन भोकरे यांनी केले. तर आभारप्रदर्शन डॉ. दीपक घरझोडे यांनी मानले. कार्यक‘माची सांगता संजय जोशी यांनी गायिलेल्या शांती मंत्र व संपूर्ण वंदे मातरमने झाली. या कार्यक‘मासाठी संजय सांबजवार, राकेश मिश्रा, मनीष गुबे, प्रशांत बोराडे, डॉ. ओंकार कोंढोलीकर, गजानन बारे यांनी परिश्रम घेतले .