गायत्री परफेक्ट प्लस या फवारणी औषधाला जिल्हा विक्रीला बंदी
सोबतच या कंपनीच्या सर्व उत्पादनाची तपासणी होणार
यवतमाळ,
Gayatri Perfect Plus: Spray medicine गायत्री मायक्रो एलिमेंट अँड केमिकल प्रा. लि. या फवारणी कंपनीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून संबंधित कंपनीचा रासायनिक खते, औषध परवाना रद्द करा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हाधिकार्यांकडे मनसेतर्फे निवेदनातून करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असताना अनेक औषधी कंपन्या आपल्या फायद्यासाठी शेतकर्यांना कोणत्याही प्रकारचे फवारणीचे औषध आपल्या वैयक्तिक लाभापोटी विक्री करीत आहे. शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान होऊन त्याच्या आयुष्याच्या कमाईचे नुकसान होते.
असाच प्रकार यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात Gayatri Perfect Plus: Spray medicine ‘गायत्री परफेक्ट प्लस’ या नावाने विकल्या जाणार्या फवारणी औषधात आढळला आहे. संबंधित फवारणी औषध शेतकर्यांनी वापरला असता अनावश्यक फांदी वाढ, पिकांची वाढ थांबणे, पाने पिवळी पडणे, तसेच अनेक ठिकाणी औषधांच्या वापरामुळे पिक हातून गेल्याच्याही शेतकर्यांनी मनसेकडे केल्या होत्या. गायत्री परफेक्ट हे औषध कापूस, सोयाबीन, तुर व इतर पिकांवर त्यांची योग्य प्रमाणात वाढ होण्यासाठी वापरण्यात येते. परंतु वास्तविकतेत याचे उलट परिणाम पिकांवर शेतकर्यांना दिसून येत आहे. या मायक्रो न्यूटीयन्ट मिक्स्चर फर्टिलायझर (रासायनिक खत) च्या बॅच नंबर ०९१ मोठ्या प्रमाणात भेसळ आढळून आली. या विषयाची दाखल घेत मनसेने संबंधित फवारणी औषधाचे नमुने घेऊन जिल्हा कृषी अधिकार्यांमार्फत हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट हेल्थ मॅनेजमेंट (राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ प्रबंधन संस्था) या शासनमान्य तपासणी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले.
Gayatri Perfect Plus: Spray medicine या तपासणी अहवालाचा अहवाल हा धक्कादायक असून २५० मिलीच्या फवारणी औषधात ४३.४६ टक्के एवढ्या प्रमाणात क्लोरोमाइट क्लोराईड हे केमिकल आढळून आले. सोबतच ‘मिस ब‘ॅण्डिंग’ म्हणजे या औषधावर छापलेल्या घटकांव्यतिरिक्त इतर घटक या तपासणी अहवालात आढळून आले. त्यामुळे प्रयोगशाळेने या औषधांच्या चाचणीला नापास घोषित केले. या कंपनीला कृषी विभागामार्फत शेतकर्यांचा बळी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाठराखण करीत असल्याचे चित्र या प्रकरणात दिसते. या औषध कंपनीविरुद्ध विक्री बंदीचे आदेश देऊनही जिल्ह्यात आजही औषधाची सर्रासपणे विक‘ी सुरू आहे.
Gayatri Perfect Plus: Spray medicine या विषयाची गंभीर दखल घेत मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी या संदर्भात उपमु‘यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ही माहिती दिली. उपमु‘यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने मनसे पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यावर जिल्हाधिकार्यांनी कृषी अधिकार्यांना बोलावून या संबंधित कंपनी विरोधात तात्काळ संपूर्ण जिल्हाभर विक्री बंदचे आदेश पारित करून या कंपनीच्या इतर उत्पादनासाठीसुद्धा तत्काळ तपासणीसाठी नमुने घेण्याचे आदेश देण्यात आले. संबंधित कंपनीवर कारवाई न झाल्यास तीव‘ आंदोलन उभारणार, असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला. यावेळी मनसेचे देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, सादिक शेख, लाला पांडे, येलगंधेवार, सोनू गुप्ता, तुषार चोंडके व इतर मनसे पदाधिकारी उपस्थित होते.