गोंडवाना विद्यापीठात वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन

    दिनांक :07-Nov-2025
Total Views |
गडचिरोली,
gondwana-university : आज ‘वंदे मातरम्’ या गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने शासनाने दिलेल्या निर्देशानुसार. आज गोंडवाना विद्यापीठ येथे ‘वंदे मातरम्’ गीताचे सकाळी 10.30 वाजता गायन करण्यात आले.
 
 
 
gad
 
 
 
यावेळी अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, परिक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रवीण पोटदुखे, वित्त व लेखाधिकारी भास्कर पठारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
 
 
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, भारत देश स्वतंत्र करण्यामध्ये देशभक्तांचा वाटा मोठा आहे. ‘वंदे मातरम्’ गीताने देशभक्तांना स्वातंत्र लढ्याच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रेरणा दिली. एखाद्या गीताने क्रांतिकारकांना प्रेरणा दिल्याचे कुठले उदाहरण असेल तर हे गीत आहे. देशाच्या स्वातंत्र्याविषयी ज्यांना रस असेल त्यांनी बकीमचंद्र चटोपाध्याय यांची ‘आनंदमठ’ ही कादंबरी वाचली पाहिजे.
 
 
आज आपण अतिशय मुक्त वातावरणामध्ये वावरतो पारतंत्र्यामध्ये देशाची काय अवस्था असेल याचा विचार आपण करायला हवाय. वंदे मातरम या गीताचा विसर पडता कामा नये. वंदे मातरम गीतात भारतमातेचे यथार्थ वर्णन केलेले आहे. केवळ आपण त्याची उजळणी करू नये तर आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ते नेले पाहिजे, असे ते म्हणाले.
 
कार्यक्रमाचे संचालन करून आभार आस्थापना विभागाचे उपकुलसचिव डॉ. कामाजी देशमुख यांनी मानले. यावेळी शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.