टीम इंडियाचा पाकिस्तानवर झकास विजय!

DLSने 2 रन्सची आघाडी!

    दिनांक :07-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
IND vs PAK Hong Kong Sixes : २०२५ च्या हाँगकाँग सुपर सिक्सच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पूल क सामन्यात टीम इंडियाने डकवर्थ-लुईस पद्धतीने २ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार अब्बास आफ्रिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ षटकांत ४ गडी गमावून ८६ धावा केल्या. टीम इंडियाकडून रॉबिन उथप्पाने सर्वाधिक २८ धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद शहजादने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने पावसामुळे खेळ थांबवण्यापूर्वी तीन षटकांत १ गडी गमावून ४१ धावा केल्या होत्या. टीम इंडिया आता त्यांचा पुढील पूल क सामना ८ नोव्हेंबर रोजी कुवेतविरुद्ध खेळणार आहे.
 
 
 
 
ind vs pak