पाच मित्रांची अमानुषता! महिलेला अर्धनग्न अवस्थेत बांधले खांबाला आणि...

    दिनांक :07-Nov-2025
Total Views |
टेक्सास,  
inhumanity-of-five-friends-texas अमेरिकेतील टेक्सास राज्यातील साउथ ऑस्टिन परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे, ज्यांनी एका महिलेचा बंदिवास करून तिच्यावर अत्याचार केला होता. विशेष म्हणजे पीडिता ही त्यांचीच मैत्रीण होती. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा ती महिला अर्धनग्न अवस्थेत एका खांबाला बांधलेली आढळली. तिच्या शरीरावर गंभीर जखमा आणि गोळ्यांच्या खुणा होत्या.
 
inhumanity-of-five-friends-texas
 
ऑस्टिन अमेरिकन स्टेट्समॅन या वृत्तपत्रानुसार, पीडितेने सांगितले की ती आरोपींपैकी एका महिलेची मैत्रीण होती आणि नेहमी त्यांच्या घरी ये-जा करत असे. परंतु काही दिवसांनी त्यांनीच तिच्यावरील रागातून तिला घरात कैद करून ठेवले. “ते मला घराबाहेर जाऊ देत नव्हते, आणि पळायचा प्रयत्न केला की मला मारहाण करत,” अस ती म्हणाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेवर आठवड्यांपर्यंत शारीरिक छळ करण्यात आला. तिच्या हात-पायांच्या मांसाचे तुकडे गायब झाले होते, आणि संपूर्ण शरीरावर बीबी गनच्या गोळ्यांचे निशाण होते. inhumanity-of-five-friends-texas रात्री तिला केवळ एक प्लेट अन्न दिले जात असे आणि तिला लोखंडी स्टँडला बांधून ठेवली जात होती. मुख्य आरोपी हुआन पाब्लो कास्त्रोने कबुल केले की त्याने खास बीबी गन विकत घेतली होती, ज्याने तो त्या महिलेला लक्ष्य करत असे. कामावरून घरी परतल्यावर तो ती गन काढून महिलेवर गोळ्या झाडत असे. घरात तिन्ही लहान मुलेही आढळली असून, त्यापैकी एकाने चौकशीत सांगितले की त्याच्या वडिलांनी त्या महिलेला गोळ्या झाडल्या, आणि त्याची आई हे सर्व पाहत होती. त्या महिलेला बाहेर झोपायला लावले जाई आणि तिच्या किंकाळ्या घरात ऐकू येत असत.
पोलिसांना 911 वरून माहिती मिळताच त्यांनी छापा मारला आणि महिलेची सुटका केली. आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना ताब्यात घेण्यात आले. inhumanity-of-five-friends-texas अटक करण्यात आलेल्यांमध्ये मिशेल गार्सिया (51), तिची दोन मुली क्रिस्टल (21) आणि माश कार्नी (32), माशचा पती हुआन पाब्लो कास्त्रो आणि 21 वर्षांचा मेनार्ड लेफेवर्स यांचा समावेश आहे. सध्या सर्व आरोपींना ट्रॅव्हिस काउंटी तुरुंगात ठेवण्यात आले आहे आणि तपास सुरू आहे.