वर्धा,
local-government-elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात निवडणूक प्रमुखांची निवड केली आहे. यामध्ये वर्धा जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून माजी खासदार रामदास तडस तर प्रभारी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश, राज्याची वेगाने प्रगती होत आहे. महाविकास आघाडीच्या काळात राज्य विकासात मागे पडले. पण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, सरकार आले. मुख्यमंत्री हे राज्याला नवी दिशा देण्याचे काम करत आहेत. ग्रामीण व शहरी या दोन्ही भागांना विकासाच्या प्रवाहात आणले जात आहे. शेतकरी, कष्टकरी समाजाचा विकास याला या सरकारने प्राधान्य दिले आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्ह्यात मोठया प्रमाणात निधी व अनेक प्रलंबीत प्रश्न तातडीने सोडविले.
आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, आ. सुमीत वानखेडे आपआपल्या क्षेत्राच्या विकासासाठी भरघोस निधी आणून विकास करीत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता भाजपासोबत राहील. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी जनता पाठीशी राहील. नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजपाचे जास्तीत उमेदवार निवडून येतील असा विश्वास वर्धा जिल्हा निवडणूक प्रमुख माजी खासदार रामदास तडस यांनी व्यत केला.