नागपूर,
Manodyan Madhavnagar आजच्या युगात शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक व चारित्र्य विकासावर भर देणारा गर्भसंस्कार हा एक महत्त्वाचा संस्कार बनला आहे. याच भावनेतून मनोद्यान ८६, माधवनगर, नागपूर संस्थेतर्फे “सर्वगुणसंपन्न बाळांसाठी गर्भसंस्कार शिबिर” आयोजित करण्यात आले आहे.हे विशेष शिबिर रविवार, ९ नोव्हेंबरला संध्याकाळी ४ ते७ या वेळेत घेण्यात येणार आहे. या शिबिरात गर्भधारणा इच्छुक दांपत्यांसह गरोदरपणाच्या कोणत्याही महिन्यातील महिला सहभागी होऊ शकतात.
शिबिरामध्ये आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्र यांचा समन्वय साधत संगीत, मंत्रोच्चार, ध्यान, योग, आणि सकारात्मक विचारांच्या माध्यमातून गर्भातील बाळाच्या सर्वांगीण विकासाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.Manodyan Madhavnagar या उपक्रमाचा उद्देश“नवीन पिढी सर्वगुणसंपन्न, निरोगी आणि सुसंस्कारी घडविणे” असा असून, सहभागी दांपत्यांना घरी अमलात आणता येतील अशा सोप्या व उपयुक्त तंत्रांचाही परिचय करून दिला जाणार आहे.
सौजन्य:अभय चोरघडे,संपर्क मित्र