शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता...पीएम किसान योजनेचा हप्ता जाहीर

    दिनांक :07-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
PM Kisan Yojana installment केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा २१ वा हप्ता जाहीर करण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आर्थिक आधार देणे हा आहे. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये ₹६,००० ची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, ज्यामुळे मध्यस्थांशिवाय निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो. प्रत्येक हप्त्यासाठी ₹२,००० देण्यात येतात.
 
 
 
PM Kisan Yojana installment
मागील हप्त्यादरम्यान ई-केवायसी आणि नोंदणी प्रक्रिया वेळेवर पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना २१ व्या हप्त्याचा फायदा होईल. गेल्या वर्षी १८ वा हप्ता ५ ऑक्टोबर रोजी आणि १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला होता. त्यामुळे अंदाज आहे की, या हप्त्याची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकते. शेतकरी आपल्या हप्त्याची स्थिती अधिकृत पीएम किसान पोर्टलवर तपासू शकतात. यासाठी त्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. योजनेच्या नियमांनुसार काही शेतकरी हप्त्यासाठी पात्र राहणार नाहीत.
त्यामध्ये फेब्रुवारी २०१९ नंतर जमीन खरेदी करणारे शेतकरी, एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांनी योजनेत नोंदणी केलेले लाभार्थी, तसेच ज्या लाभार्थ्यांच्या दाव्यांमध्ये तफावत आहे अशा लोकांचा समावेश आहे. अशा लाभार्थ्यांची देयके पडताळणी पूर्ण होईपर्यंत रोखली जातात. पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पात्रतेची माहिती ई-मित्र चॅटबॉट किंवा केवायएस सेवेद्वारे उपलब्ध आहे. तसेच, प्रत्येक हप्ता जाहीर होण्याआधी सरकार लाभार्थी यादी अपडेट करते, ज्यामध्ये राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव यांचा समावेश असतो. या योजनेमुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळत असून त्यांच्या उत्पन्नाच्या स्थिरतेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाते.