दिग्रस,
देशाच्या स्वतंत्रता संग्राममध्ये चेतना जागविण्याचे कार्य वंदे मातरम गीताने केले असून त्याची प्रासंगिकता आजही आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते Purval Supare पूर्वल सुपारे यांनी व्यक्त ते वंदेमातरम् गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दिग्रस येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केले. तर अध्यक्षीय भाषणामध्ये तहसीलदार मयूर राऊत यांनी आजच्या युवा पिढीने या गीतापासून प्रेरणा घ्यावी, असे विचार व्यक्त केले.
भारतमातेच्या गौरवगाथेचे वर्णन असलेल्या वंदे मातरम् या राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असलेल्या गीत निर्मितीला १५० वर्ष पूर्ण आहेत. याचे औचित्य साधून राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्रालय आणि कौशल्य रोजगार व नाविन्यता उद्योग मंत्रालयाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रसत सामूहिक वंदे मातरम् गीत गायनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून याचे आयोजन करण्यात आले होते. याच अंतर्गत येथील तालुका क्रीडा संकुल परिसरात हा कार्यक‘म घेण्यात आला. मयूर राऊत यांच्या अध्यक्षतेत पूर्वल सुपारे प्रमुख वकता म्हणून उपस्थित होते.
Purval Supare गटविकास अधिकारी रमेश खारोडे, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, कृषी अधिकारी धनुडे, तालुका भूमी अभिलेखचे उपअधीक्षक एसएन पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, प्राचार्य वानखडे, प्राचार्य अरविंद लाडोळे, गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार, औद्योगिक प्रशिक्षण संस्था समिती सदस्य सुभाष अटल, बेलगमवार, सुरेंद्र मिश्रा, करवा, प्रा. दिवे व विविध प्रशासकीय कार्यालयाचे अधिकारी, प्रतिनिधी विविध शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी शिक्षक व निमंत्रित उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांनी सामूहिक वंदेमातरम्चे गायन केले. यावेळी देशभक्तीवर आधारित लघु नाटिका देखील प्रस्तुत करण्यात आली. विद्यार्थ्याच्या वंदे मातरम जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणला होता.