Ralegaon Revenue Department वर्धा नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर रेती वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल विभागाने मोहिम उघडली आहे. अशातच महसूल विभागाच्या पथकाने रेतीची अवैध वाहतूक प्रकरणी एक टिप्पर जप्त वडकी पोलिस ठाण्यात लावण्यात आला. ही कारवाई ६ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता खैरी येथे करण्यात आली. या कारवाईमुळे वाळू माफीयांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. राळेगाव तालुक्यात सर्वात मोठ्या वर्धा नदीपात्रात गेल्या काही काळापासून अवैध उत्खनन व रेती वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. महसूल पथक यावर कारवाई करण्याऐवजी दुर्लक्ष असल्याचे चित्र होते.
Ralegaon Revenue Department तसेच अवैध रेती तस्करीस काही प्रमाणात स्थानिक पातळीवरून मिळणार्या सहकार्यामुळे तस्करांचे मनोबल वाढल्याचे निरीक्षण आहे. मात्र महसूल विभागाने कठोर भूमिका घेत अवैध रेती तस्करी करणारा टिप्पर जप्त करून पुढील कारवाईसाठी वडकी पोलिस ठाण्यात लावण्यात आला आहे. ही कारवाई निवासी नायब तहसीलदार नरेंद्र हलामी, मंडळ अधिकारी महादेव मंडळ अधिकारी दिलीप चिडे, ग‘ाम महसूल अधिकारी हर्ष गायकी, निळोबा मातकर, अमोल मोरे, महसूल सेवक उमेश चांदेकर, मनोज आत्राम, वाहन चालक बादल पिंपरे यांनी केली आहे.