रिमझिम सरींमध्ये नागरिक, अधिकारी विद्यार्थी वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग
पुसद,
राष्ट्रीय एकता दिवस व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पुसद येथे Run for Unity ‘रन फॉर युनिटी’ हा एकात्मतेचा संदेश देणारा उपक‘म मोठ्या उत्साहात पार पडला. उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन पुसद शहर व वसंतनगर, नगरपालिका आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त सहकार्याने या कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते.
Run for Unity या दौडीला उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल व उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बी. जे. यांनी हिरवी झेंडी दाखवली. यशवंत रंगमंदिर येथून सुरुवात झालेल्या या दौडीचा समारोप स्टेडियम येथे राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक‘माच्या शेवटी आभार सहाय्यक पोलिस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. यांनी मानले.
Run for Unity यावेळी माजी आमदार अॅड. निलय नाईक, भाजपाचे पुसद जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, जिल्हा उपाध्यक्ष दीपाली जाधव, डॉ. रूपाली जयस्वाल, तहसीलदार महादेव जोरवर, ठाणेदार सेवानंद वानखडे, ठाणेदार सतीश जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड, धीरज आडे, रोटरी क्लब अध्यक्ष राम पद्मावार, सचिव डॉ. गणेश पाटील, विनोद जिल्हेवार, अनिरुद्ध चोंढीकर, प्रा. संजय चव्हाण, डॉ. शैलेंद्र नवथळे, अॅड. विश्वास भवरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक धीरज बांडे, प्रेमकुमार केदार, तसेच नितेश भालेराव व अरविंद चव्हाण उपस्थित होते.