दारव्हा आगार व्यवस्थापक उजवणे विरोधात विनयभंगाचा गुन्हा

    दिनांक :07-Nov-2025
Total Views |
महिला कर्मचार्‍यांची तक्रार 
पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी

दारव्हा, 
येथील राज्य परिवहन महामंडळाचे आगार व्यवस्थापक S T corporation : nitin uzhavaneनितीन उजवणेच्या विरोधात दारव्हा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा गुरूवार, ६ नोव्हेेंबर रोजी दाखल करण्यात महिला कर्मचार्‍याने दिलेल्या तक्रारीनुसार, दारव्हा आगार व्यवस्थापक हे गेल्या आठ महिन्यांपासून महिला लिपीकाला हेतूपुरस्सर त्रास देत होता. आगारातील कोणतेही कागद काढायचे असल्यास संबंधित महिला कर्मचार्‍यांचाच नावे काढत होता. यासंदर्भात महिला लिपीक कर्मचार्‍यांनी विचारणा केली असता जोपर्यंत माझ्या म्हणण्याप्रमाणे वागणार नाही, तोपर्यत असाच त्रास सहन करावा लागेल असे म्हणत होता. दस्त स्वाक्षरीसाठी घेऊन गेले असता वाईट उद्देशाने हात लावण्याचा प्रयत्न करीत होता. चारचौघात द्विअर्थी बोलणे, वरिष्ठांना खोटी माहिती देऊन बदनामी करण्याचे षडयंत्र आगार व्यवस्थापक उजवणे याने रचले आहे.
 

crime 
 
वरिष्ठ असल्याने तसेच समाजात आपली बदनामी होईल या भीतीने यापूर्वी तक्रार केली नव्हती. मात्र, कार्यालयाकडे वेळोवेळी लेखी तसेच अनेकवेळा मौखिक तक्रारी आहेत. गुरूवारी पहाटे साडेपाच ते दीड वाजेपर्यंत नियोजित कामगिरी केली. त्यानंतर कार्यालयातून पायदळ नातूवाडी येथील घरी जाण्यासाठी पायदळ निघाली. त्याचवेळी नातूवाडी मार्गावरील नाक्याजवळ आगार व्यवस्थापक नितीन उजवणे (नवेगाव बांध, जि. गोंदिया ह. मु. नातूवाडी) हा दुचाकी घेऊन मागे आला. पुढे जाऊन दुचाकी थांबविली तसेच अश्लील हातवारे केले, मी जोरात दिल्यानंतर आगार व्यवस्थापक उजवणे यांनी गाडीची स्पीड वाढवून पळ काढला, अशी तक‘ार महिला कर्मचार्‍याने दारव्हा पोलिस ठाण्यात दिली. यावरून आगार व्यवस्थापकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी आगार व्यवस्थापक उजवणे याला न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणात ठाणेदार मुळे यांच्या मार्गदर्शनात शिवशंकर कायंदे करीत आहेत.
इतर कर्मचार्‍यांनीही वाचला तक्रारींचा पाढा
कायम वादग‘स्त असलेल्या दारव्हा आगार व्यवस्थापक S T corporation : nitin uzhavane नितीन उजवणेच्या विरोधात तक्रार दाखल होताच एसटी महामंडळातील अनेक कर्मचार्‍यांनी पोलिसांकडे तक‘ारींचा पाढाच वाचला. अनेक चालक-वाहकांनी दारव्हा आगारात सुरू असलेल्या ‘कारभारा’ची माहिती पोलिसांना दिली.
महिलांच्या सामूहिक तक्रारीनंतरही अभय ?
दारव्हा व्यवस्थापक नितीन उजवणेच्या विरोधात अनेक महिला कर्मचार्‍यांच्या तक्रारी आहेत. सात महिला कर्मचार्‍यांनी सामूहिक तक्रार विभाग नियंत्रकांकडे केली होती. महिलांच्या तक्रारी असतानाही वादग्रस्त उजवणेवर कारवाई झाली नाही. यामुळेच त्याचे धाडस वाढले. तक्रारीनंतरही त्याला अभय कुणाचे, अशी चर्चा दारव्हा आगारात सुरू आहे.