जिल्ह्यात ‘क्रीम पोलिस ठाणे’ म्हणून ओळख असलेल्या अवूधतवाडी पोलिस ठाण्यांतर्गत एकूण आठ अड्ड्यांवर भिंगरीची गरगर चालते. त्याचबरोबर Sand mining रेती उपसा व मुरुम उत्खननसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे सर्व पोलिसांच्या आशीर्वादाने असल्याने यावर ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे पोलिस अधीक्षक कुमार चिंता आतातरी कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले
सतत वादात असणाच्या अवधूतवाडी पोलिस ठाण्यांतर्गत एकूण आठ भिंगरी अड्डे सुरू आहेत. त्याचबरोबर मटकाही सुरुच आहे. तर अवधूतवाडी पोलिस ठाण्यातंर्गत मोठ्या प्रमाणात रेती व मुरुम उत्खनन होत आहे. Sand mining या अवैध धंद्यातून मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन होत असल्याने या धंद्यांना छुपा पाठिंबा प्रशासनाकडून मिळतो. त्याचबरोबर शहरातील कॉटन मार्केटमध्येसुद्धा भिंगरी व मटका आहे. तरी यावर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी लक्ष देऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या अवैध धंद्यामुळे यवतमाळातील तरुणाई या भिंगरीच्या आहारी जात आहे.
‘त्या’ कर्मचार्याचा रात्री फेरफटका
Sand mining अवधूतवाडी ठाण्यातंर्गत कोणताही अवैध व्यवसाय सुरू करायचा असेल तर एका कर्मचार्याकडून त्याची ‘एनओसी’ घ्यावी लागते. कर्मचार्याची ‘एनओसी’ म्हणजे संपूर्ण ठाण्याची ‘एनओसी’ असल्याचे त्या कर्मचार्याकडून सांगण्यात येते. हा कर्मचारी रात्रीसुद्धा फेरफटका मारून लक्ष्मीदर्शन करतो.