बुलडाणा,
State Level Award : कपिलधार ता.जि.बीड, संतशिरोमणी मन्मथ स्वामींच्या २४व्या शासकीय महापूजेच्या ऩतर प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न झालेल्या शिवा संघटनेच्या राज्यव्यापी ३०व्या महा मेळाव्यात बुलडाणा जिल्ह्याने पुन्हा एकदा राज्यपातळीवर आपली ओळख ठसवली. देशभरातील उत्कृष्ट कार्य करणार्या व्यक्ती, संस्था व शाखांचा गौरव म्हणून प्रदान करण्यात आलेल्या शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कारां मध्ये शिवा संघटना बुलडाणा तालुका शाखेला उत्कृष्ट तालुका शाखा म्हणून सन्मानित करण्यात आले.

मनोहर धोंडे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील काही नवीन पदनियुक्त्यांची घोषणा केली आहे यामध्ये शिवा संघटना मुख्य शाखा बुलडाणा जिल्हा सरचिटणीस काशीनाथ आप्पा सपकाळ यांची शिवा संघटना कर्मचारी महासंघ बुलडाणा जिल्हा अध्यक्ष, अरुण आप्पा बोरबळे यांची शिवा संघटना मोताळा तालुका अध्यक्ष, केतन आप्पा मोदे यांच्या नवनियुक्त्या करण्यात आल्या. तसेच, शिवा संघटना सोशल मीडिया जालना जिल्हा अध्यक्ष पदी प्रमोद देशमाने यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. हजारो शिवा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत, शिवा संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे , सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, भाजपच्या अर्चना चाकुरकर, तसेच लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय व राज्य पदाधिकारी, अनेक पत्रकार बांधव आणि लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा संपन्न झाला.