खामगांव,
siddhivinayak-technical-campus : स्थानिक वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था खामगाव द्वारा संचालित सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस शेगाव येथे दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी महाविद्यालयामध्ये "वंदे मातरम" या गीताचे सामूहिक गाण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सागर भाऊ फुंडकर यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये देश भावना जागृत होण्यासाठी महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम राबविल्या जातात.
त्या अनुषंगाने 7 नोव्हेंबर 2025 रोजी वंदे मातरम या गीतास 150 वर्ष पूर्ण होत आहे यानिमित्त महाविद्यालयामध्ये ठीक सकाळी 10:45 या वेळेत वंदे मातरम या गीताचे सामूहिक गाण आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुलकर्णी , तंत्रनिकेतन प्राचार्या प्रा. प्रीती चोपडे अधिष्ठाता डॉ. धीरज वानखडे , प्रा. सचिन इंगळे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात ही भारतमातेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम’चे सामूहिक गायन घडविण्यात आले. संपूर्ण परिसर देशभक्तीच्या जयघोषांनी दुमदुमला.
या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रगीताच्या ऐतिहासिक वारशाची जपणूक आणि तरुण पिढीत देशभक्तीची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सागर सोनोने, प्रा. राजेश महाजन महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. माधुरी क्षीरसागर व शारीरिक व क्रीडा विभागाचे प्रा. ज्ञानेश्वर फुंडकर यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या यशस्वी उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सागर दादा फुंडकर आणि संस्थेचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अँड. आकाश दादा फुंडकर यांनी शुभेच्छा दिल्या.