वर्धा,
samuhik-tulsi-vivah : कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाहाचा समारोप झाला. २ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत तरुण भारतच्या वतीन शताब्धी वर्षानिमित्त सामूहिक तुळशी विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धेतील हवालदारपुर्यात झालेल्या सामूहिक तुळशी विवाहात चक लहान मुलांनी खेळण्यातील ढोलकं वाजवत लहान मुलांच्या रिमोटच्या कार मधून नवरी तुळशीला मंडपात आणले. यावेळी प्रत्येक तुळशी नवरीसारखी सजवण्यात आली होती.

शहरातील मालगुजारीपुरा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासुन सामूहिक तुळशी विवाहाची परंपरा आहे. परिसरातील १५ ते २० कुटुंब एकत्र येऊन हा सामूहिक तुळशी विवाहाचा सोहळा धुमधडायात साजरा केल्या जातो. यावर्षी तरुण भारतने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नपचे माजी उपाध्यक्ष कमल कुलधरिया यांच्या पुढाकाराने तरुण भारतने तुळशी विवाहाकरिता दिलेले वृंदावन लहान मुलांच्या खेळण्यातील रिमोट कन्ट्रोलच्या धार या कारमधून मंडपात आणल्या गेली. विशेष म्हणजे परिसरातील लहान मुलांनी स्वत: आपल्या खेळण्यातील ढोलकं वाजवत या उपक्रमाचा आनंद लुटला. औपचारिक कार्यक्रम झाल्यानंतर ढोल ताश्यांच्या निनादात, फटायांच्या आतषबाजीत हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर आदी परिसरातून पालखी परिक्रमा करण्यात आली. स्वागत दारावर वर्हाड्यांचे औक्षण करण्यात आले. वर्हाड्यांना अक्षदांचे वाटप झाल्यानंतर मंगलाष्टकं झाली आणि खराखुरा वाटावा असा हा सामूहिक तुळशी विवाह पार पडला.
कार्यक्रमाला चंचला कावळे, शितल कुलधरिया, शिवांगी किटे, स्विटी बोरसरे, प्रिया किटे, स्वाती कुलधरिया, ममता कुलधरिया, अभिजित कुलधरिया, कांचन कुलधरिया, राहुल कुलधरिया आदींसह परिसतील २०० पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते.