टिम डेव्हिडचं घाणेरडं सेलिब्रेशन...व्हिडीओ व्हायरल

    दिनांक :07-Nov-2025
Total Views |
सिडनी,
Team David celebrates भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेच्या चौथ्या सामन्यात मैदानावर एक विचित्र प्रसंग घडला, ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या बाद होण्यावर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू टीम डेव्हिडने केलेले सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना १६७ धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार सूर्यकुमार यादवने दमदार सुरुवात केली होती, पण तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.
 
Team David celebrates
 
१६ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टिम डेव्हिडच्या हातून तो सीमारेषेवर झेलबाद झाला. सूर्याने १० चेंडूत २० धावा केल्या. मात्र, त्याच्या झेलानंतर टिम डेव्हिडने केलेल्या सेलिब्रेशनने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने चेंडू पकडल्यानंतर चेंडू चाटण्याचा अभिनय केला, ज्यामुळे चाहते आणि तज्ज्ञ दोघेही गोंधळले. अनेकांना हे कृत्य अयोग्य आणि अशोभनीय वाटले. यानंतरच्या खेळात भारताने ऑस्ट्रेलियावर दबाव कायम ठेवला. १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मिचेल मार्श आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी पहिल्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोकळीक दिली नाही. मिचेल मार्श, जोश फिलिप, टिम डेव्हिड, मार्कस स्टोइनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांसारख्या प्रमुख फलंदाजांना फारसा प्रभाव पाडता आला नाही.
 
 
 
ऑस्ट्रेलियाचा डाव १८.२ षटकांत केवळ ११९ धावांवर आटोपला आणि भारताने हा सामना तब्बल ४८ धावांनी जिंकला. या विजयासह सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. आता मालिका गमावण्याचा प्रश्नच राहिला नाही. येत्या शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी होणारा अखेरचा सामना निकाल ठरवणारा ठरणार आहे. मैदानावरील टिम डेव्हिडचे हे वादग्रस्त सेलिब्रेशन मात्र सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले असून, अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी ते खेळाडूप्रति अनादर म्हणून पाहिले, तर काहींनी ते केवळ मजेशीर प्रतिक्रिया म्हणून घेतले. पण एकूणात, या प्रसंगाने चौथ्या टी-२० सामन्याच्या विजयाइतकाच गाजावाजा केला आहे.