फायनान्स कंपनीच्या कर्मचार्‍यानेच घातला १४ लाखांचा गंडा

    दिनांक :07-Nov-2025
Total Views |
वर्धा,
wardha-news : स्थानिक आरती चौकातील इसाफ स्मॉल फायनान्स बँकेतील कर्मचार्‍याने बचतगटातील ४१ महिलांकडून कर्जाचे वसुल केलेले १४ लाख ११ हजार ९२१ रुपये स्वतः वापरून बँकेची फसवणूक केली. ही घटना गुरुवार ६ रोजी उघडकीस आली.
 
 
fraud
 
आरती टॉकीज चौकात इसाफ स्मॉल फायनान्स बँक असून तिथे प्रज्वल शेंडे हा एसओ पदावर कार्यरत आहे. बँकेच्या वतीने बचतगटातील महिलांना कर्ज दिले जाते. त्या महिलांकडून प्रज्वल कर्जाची वसुली करीत होता. दरम्यान, त्याने ४१ महिलांकडून १४ लाख ११ हजार ९२१ रुपये वसुल केले. परंतु, ती रकम बँकेत जमा न करता महिलांना एटीएम कार्ड न देता प्रज्वलने बँकेतील पैशांची अफरातफर केल्याची कबुली देऊन पैसे भरण्यास वेळ मागितली होती. परंतु, त्याने अद्यापही पैसे दिले नसून तो टाळाटाळ करीत आहे. बँकेचे विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल मगर यांच्या तक्रारीवरून वर्धा शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.