पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत पेटवले

*वडनेर येथील घटना

    दिनांक :07-Nov-2025
Total Views |
वडनेर, 
wife-burned-alive-wadner : पत्नीचे गावातीलच तरुणाशी असलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले. यामध्ये सदर महिला ८० टके जळाली असून ती नागपूर येथे शासकीय रुग्णालयात मृत्यूची झुंज देत आहे. ही घटना गुरुवार ६ रोजी वडनेर येथे घडली.
 
 
k
 
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणघाट तालुयातील वडनेर येथील शरद मांगरूटकर हा दारू विक्रेता म्हणून प्रसिद्ध आहे. गावातीलच ठोक दारू विक्रेत्याशी दारू पुरवठ्याचे काम करीत असताना संगत सोडल्याने शरद याने स्वतः घरीच गेल्या दोन वर्षापासून दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. अशातच पत्नी आणि दोन मुले घेऊन हा व्यवसाय करीत असताना शरदची पत्नी शीतलचे गावातील एका तरुणाशी प्रेम संबंध जुळले असल्याची गावात चर्चा आहे.
 
 
एक वर्षात शरदची पत्नी ही त्या तरुणांसोबत घर सोडून गेल्याचे बोलल्या जाते. गेल्या चार महिन्यापूर्वी शरदने सर्व सहन करीत पत्नीला घरी आणले. मात्र, पत्नी शितलचे संबंध त्या तरुणासोबत असल्याची खात्री झाल्यानंतर प्रत्यक्ष बघून शरदने गुरुवारी पत्नी शितलच्या अंगावर पेट्रोल टाकून घरातच जाळले. यामध्ये शीतल ८० टके जळाली. तिला तात्काळ वडनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी सेवाग्राम रुग्णालयात रेफर केले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने सेवाग्राम येथे प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविले. ती मृत्यूशी झुंज देत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी वडनेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्मा यांनी गुन्हा दाखल केला.