पुण्यानंतर नाशिकमध्ये बिबट्याचा हल्ल्यात तरुण ठार!

    दिनांक :07-Nov-2025
Total Views |
नाशिक,
Youth killed in leopard attack in Nashik पुण्यापाठोपाठ नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे गावात एका बिबट्याच्या हल्ल्यामुळे ३५ वर्षीय सुदाम जुंदरे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांना गावाजवळ छिन्नविछिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे आणि नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
 
Youth killed in leopard attack in Nashik
 
गेल्या काही दिवसांपासून लोहशिंगवे परिसरात बिबट्याचा सतत वाढता संचार दिसत असून, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधीही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि देवळाली परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे तिघांचा बळी गेला होता. सतत वाढत असलेल्या या घटनांमुळे वन विभागावर नागरिकांचा रोष व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांचा आग्रह आहे की पिंजरा लावून बिबट्याला ताब्यात घेण्यात यावे, जेणेकरून भविष्यात अशा धोकादायक घटनांची पुनरावृत्ती होऊ नये.