...आणि मुली जिंकल्या!

    दिनांक :08-Nov-2025
Total Views |
रेवती जोशी-अंधारे
9850339240
 
 
 
ICC Women World Cup 2025 भारतीय महिला क्रिकेट संघाने 50 षटकांच्या एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक जिंकला. विश्वचषक मालिकेत धडपडत झालेली सुरुवात, फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडू ऐनवेळी दुखापतग्रस्त होणं, सोशल मिडियावरचं हिणकस ट्रोलिंग, दुसरे संघ सामना हरल्याने उपांत्य फेरीत झालेली धडाकेबाज एन्ट्री आणि सरतेशेवटी विश्वचषक घरी घेऊन येणाèया या संघाचा नाट्यमय प्रवास एखाद्या चित्रपटाला साजेसा आहे. संघातील प्रत्येक मुलीला स्वत:ची गोष्ट आहे. गल्लीबोळात ‘मुलींना क्रिकेट समजत नाही’ इथपासून आयसीसी विश्वचषक उचलण्यापर्यंतच्या प्रवासाची ही गोष्ट!
 
 
 
ICC Women World Cup 2025
गेली अनेक दशकं, ICC Women World Cup 2025  अगदी या शतकाच्या सुरुवातीपर्यंत भारतीय क्रिकेटचा चेहरा म्हणजे ‘ब्लीड ब्ल्यू’ म्हणणारे, अशक्यकोटीचे स्टारडम असलेले, स्टायलिश पुरुष! ज्यांची मैदानातील कारकिर्द संपताच कॉमेंट्री बॉक्समधली सुरू होते, लोकप्रियता आणि टीकेचे धनी अशा दुहेरी भूमिकेत वावरणारे हे खेळाडू क्रिकेटधर्मियांच्या गळ्यातील ताईत होते आणि आहेत. पण, हे सगळं सुरू असताना, त्यांनाच आदर्श ठेवून भारताच्या गल्लीबोळात, धूळभरल्या मैदानांवर फक्त आणि फक्त ‘जुनून’ असलेलं क्रिकेट रंगत होतं. टेप लावलेला टेनिस बॉल, कोणाची तरी वापरून झालेली बॅट, पायात चपला आणि मनात क्रिकेटची धुंदी! गोऱ्या-नाजूक अशी स्त्रीसौंदर्याची व्याख्या करणाèयांपुढे, उन्हात रापलेल्या अन् कणखर बांध्याच्या मुलींच्या डोळ्यांतील स्वप्न हळूहळू पुढे आली. हा प्रवास सोपा नव्हता.
 
 
 
लखनौमध्ये वर्ष ICC Women World Cup 2025  1973 मध्ये महेंद्र कुमार शर्मा यांनी वुमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेची नोंदणी केली आणि भारतात महिला क्रिकेटचा पाया रचला. त्यावेळी महिलाच काय पण पुरुषांच्या क्रिकेटमध्येही फारसा पैसा नव्हता. महिला क्रिकेटसाठी कोणतेही नियामक मंडळ किंवा फंडींग नव्हते. महिला क्रिकेटपटू स्वत:साठी कपडे शिवत, सामने खेळायला जाताना विना आरक्षण रेल्वेतून प्रवास करीत, कोणाचेतरी वापरलेले बॅट-पॅड उधारीवर आणीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांची ‘या कोणते तीर मारणारेत’ असा प्रश्न विचारणारी हिणकस नजर सहन करीत. वर्ष 1976 मध्ये भारतीय संघाने वेस्टइंडिजच्या विरोधात बंगळुरूच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला. ही संधी विश्वचषक सामन्यापेक्षा कमी नव्हतीच. डायना एडुल्जी, शांता रंगास्वामी, संध्या अग्रवाल या क्रिकेटपटूंनी भारतीय मुलींसाठी रस्ता बनविला.
 
 
संघर्षाचा हा ICC Women World Cup 2025 प्रवास तीन दशकांपर्यंत सुरू राहिला आणि वर्ष 2005 मध्ये भारतीय मुली पहिल्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचल्या. कर्णधार मिताली राज, झूलन गोस्वामी, अंजू जैन, अंजुम चोपडा...फक्त दर्जेदार क्रिकेटच्या भरोशावर या मुली खेळत राहिल्या. त्या अंतिम सामना हरल्या पण, इथेच विश्वविजेता बनण्याची उर्मी उसळली. क्रिकेटच्या जागतिक स्तरावर भारतीय मुलींचं स्थान या विश्वचषकाने दाखवून दिलं. वर्ष 2006 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला क्रिकेटला आपल्या नियंत्रणाखाली घेतलं आणि वेगवान बदल झाले.त्यात बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंना पुरुष क्रिकेटपटूंइतकं मानधन म्हणजे समान वेतन धोरण लागू केलं. वुमेन्स प्रिमियर लीगची सुरुवात झाली. हे दोन क्रांतीकारी निर्णय महिला क्रिकेटपटूंसाठी ऐतिहासिक ठरले. भारतातील महिलांच्या क्रिकेटला बीसीसीआयसारखा मंच आणि त्यामुळे एक ओळख मिळाली, आर्थिक स्वातंत्र्य मिळालं. 2025 चा विश्वविजय म्हणजे केवळ ट्रॉफी, पुरस्कारांचा वर्षाव, पैशांची कमाई आणि शाब्बासकीची थाप नाही तर हा त्या प्रत्येक मुलीचा विजय आहे जिने कधी ना कधी ‘तुझ्याच्याने नाही होणार’ हे वाक्य ऐकलंय, हा त्या प्रत्येक आईचा विजय आहे जी मुलीसाठी नवे जोडे-बॅट घ्यायला पै-पै साठवत होती, हा त्या प्रत्येक बापाचा विजय आहे ज्याने समाजप्रवाहाविरोधात जाऊन लेकीसाठी बाहुलीऐवजी बॅट आणण्याची हिंमत दाखवली, हा अमोल मुजुमदारांसारख्या प्रत्येक पुरुष सहकाèयाचा विजय आहे ज्याने ‘आता नाही तर कधीच नाही’ हा मंत्र भारतीय टिमला दिला.
 
 
स्त्री-पुरुष समानतेची नवी व्याख्या रुजविणारा हा विजय, अंतिम नाही. भारतीय महिला संघासाठी विश्वविजय ही परंपरा ठरावी. चाहते ‘विराट कोहली’ लिहिलेल्या जर्सीसोबतच ‘स्मृती मंधाना’ लिहिलेल्या जर्सीतही दिसतील, हाच क्रिकेटचा आणि भारताचा विजय असेल.
 
 

कोण होते महेंद्र कुमार?
महिला क्रिकेट असोसिएशनची स्थापना करणारे महेंद्र कुमार शर्मा पाच वर्षे या संस्थेचे संस्थापक सचिव होते. वर्ष 1978 मध्ये भारतात आयोजित महिला विश्वचषकाच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्याचकडे होती. या संस्थेने 1997 मध्येही विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भूषविलं. समर्पण भावनेने कार्यरत शर्मा यांनी दूरदर्शी निर्णयांतून महिला क्रिकेटला ओळख मिळवून दिली. त्यांनी 1973 मध्ये भारतात सर्वप्रथम महिला नॅशनल क्रिकेट टूर्नामेंटचं आयोजन केलं ज्यात केवळ 3 संघ सहभागी झाले. नंतर ही संख्या 14 पर्यंत गेली. त्यांनी रचलेल्या पायावर आज भारतीय मुलींनी विश्वचषकाचा कळस चढवला आहे.
 
 

Mahendra Kumar Sharma, who founded the Women 
 
 
जागतिक महिला क्रिकेटचा इतिहास
केवळ भारतीयच नाही तर जगभरातील महिला क्रिकेटपटूंचा प्रवास संघर्षाचा राहिला आहे. वर्ष 1745 मध्ये महिलांचा पहिला क्रिकेट सामना इंग्लंडच्या सरे इथे खेळविला गेला. महिला क्रिकेटची लोकप्रियता कासवाच्या गतीने वाढत होती. वर्ष 1890 ते 1918 च्या दरम्यान 140 पेक्षा जास्त महिला क्रिकेट क्लब स्थापन झाले. वर्ष 1926 मध्ये वुमेन्स क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली. त्याआधीपर्यंत मुली लांब स्कर्ट, ब्लाऊज आणि टोपी घालून क्रिकेट खेळत. या स्कर्टमध्ये बॉल अडकतो म्हणून क्रिस्टीना विल्सने अंडरआर्म बॉलिंग सुरू केली. बहुतांश महिला हौसेखातर क्रिकेट खेळत. ओरिजिनल इंग्लिश लेडी क्रिकेटर्स क्लबच्या क्रिकेटपटूच मानधन घेत असत. शालेय स्तरावर मुलींनी क्रिकेट खेळण्यावर खुद्द इंग्लंडमध्येच बंदी होती.
 
 
 
 
महिला क्रिकेटचे नियम वेगळे?
दक्षिण आफ्रिकेची ICC Women World Cup 2025 अभिनेत्री आणि लेखिका थान्या वूर हिने स्वत:च्याच संघावर केलेल्या टिकेनंतर महिलांना क्रिकेटमध्ये सवलती मिळतात का? हा प्रश्न उपस्थित झाला. तर, क्रिकेटच्या मुख्य नियमांमध्ये कोणताही फरक नाही. मात्र, काही तांत्रिक बाबींमध्ये नक्कीच फरक आहे. पुरुषांच्या सामन्यांशी संबंधित वन डे, टी-20 आणि कसोटी सामन्यांचे नियम डिसेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. तर महिला क्रिकेट सामन्यांचे नियम 1 जानेवारी 2024 पासून लागू झाले आहेत. त्याचवेळी वाईड, नो बॉल, षटकं आणि पंचांचे निर्णय यासारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये कोणताही बदल नसल्याचं बीसीसीआयच्या नियमावलीत स्पष्ट केलं आहे. पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाèया चेंडूच्या आकारात फरक असतो. बीसीसीआयच्या नियमांनुसार, महिला क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाèया नवीन चेंडूचे वजन 140 ग्रॅमपेक्षा कमी आणि 151 ग्रॅमपेक्षा जास्त असता कामा नये. चेंडूचा परीघ 21 सेंटीमीटरपेक्षा कमी आणि 22.5 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावा. तर पुरुषांच्या क्रिकेट सामन्यात वापरल्या जाणाèया नवीन चेंडूचे वजन 155.9 ग्रॅमपेक्षा कमी आणि 163 ग्रॅमपेक्षा जास्त नसावे.
 
 
 
चेंडूचा घेर किमान 22.4 सेंटीमीटर आणि जास्तीत जास्त 22.39 सेंटीमीटर असावा. महिलांच्या एकदिवसीय सामन्यांबाबत संघाचा डाव (50 ओव्हर) तीन तास 10 मिनिटांच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. पण मालिका किंवा स्पर्धा ज्या देशात आयोजित केली जात असेल, त्या देशाला या वेळेत बदल करण्याचे अधिकार आहेत. महिलांच्या एकदिवसीय सामन्यांसाठी ओव्हर रेट हा ताशी 15.79 असावा तर सीमारेषा खेळपट्टीच्या मध्यभागापासून 70 यार्ड (64 मीटर) पेक्षा जास्त आणि 60 यार्ड (54.86 मीटर) पेक्षा कमी असू नये असा नियम आहे. पुरुषांच्या सामन्यांमध्ये, सीमारेषेचे अंतर खेळपट्टीच्या मध्यापासून 90 यार्ड (82.29मीटर) पेक्षा जास्त नसावे आणि 65 यार्ड (59.43 मीटर) पेक्षा कमी नसावे.