३ हजार विद्यार्थ्यांचा ‘वंदे मातरम’चा गजर

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
नागपूर,
150 years of Vande Mataram ऋषी भगीरथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जाम यांच्या वतीने विद्या विकास महाविद्यालयाच्या मैदानावर ‘वंदे मातरम’च्या १५० व्या वर्षानिमित्त सामूहिक गायन कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात सात शाळांमधील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी प्रभारी तहसीलदार महेश देशमुख, प्रमुख वक्ते अभिषेक द्विवेदी, तसेच गटशिक्षणाधिकारी अशोक गिद्देवार, डॉ. नयना तुळसकर, डॉ. किशोर रेवतकर, प्रा. मेघश्याम ढाकरे, भालचंद्र रासेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 

vande 
 
 
अभिषेक द्विवेदी म्हणाले की, ‘वंदे मातरम’ गीतामुळे राष्ट्रभक्तीची भावना जागृत झाली. अध्यक्ष महेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवेची प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.150 years of Vande Mataram  प्रास्ताविक प्राचार्य भालचंद्र रासेकर यांनी, संचालन प्रा. ढाकरे यांनी व आभार प्रणव हळदे (नागपूर ) यांनी मानले.
सौजन्य:प्रणव हळदे,संपर्क मित्र