डॉ. पर्बतांचे ज्येष्ठ नागरिकांकरिता केलेले कार्य कौतुकास्पद : दत्ता मेघे

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
आजनसरा, 
datta-meghe : सामाजिक क्षेत्रात काम करत असताना ८० टके समाजकारण व २० टके राजकारण या तत्त्ववार जेष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी काम करण्याची ईच्छा मनात जागृत झाली. आपले वय ९० आहे. या वयात माझ्या समवयस्क लोकांची सेवा माझ्या हातून घडावी या संकल्पनेतून तळमळ असणार्‍या डॉ. विजय पर्बत यांच्या सारख्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या सहकार्‍याने हा सेवाभावाचा रथ निरंतर पुढे जात आहे. यात डॉ. विजय पर्बत यांचे उत्कृष्ठ कार्य सुरू असल्याचे कौतुक माजी खासदार व ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी केले.
 
 
k l
 
सावंगी (मेघे) येथे आयोजित बैठकीला प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राजू मिश्रा, मनोहर पंचारिया, रमेश खडसे, दामोधर राऊत, हिंगणघाट समुद्रपूर तालुका संयोजक डॉ. विजय पर्बत यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
मेघे पुढे म्हणाले की, डॉ. पर्बत यांनी २० ठिकाणी समिती गठीत करुन त्यांना ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर ला जोडल्या गेले. समाजाची सेवा करताना ईश्वरीय सेवा केल्याचे समाधान मिळत आहे. अनेकांच्या कुटुंबातील सदस्य कामानिमित्त बाहेर गावी राहतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणीत मदतीसाठी ज्येष्ठ नागरिकच धावून येऊ शकतात म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी संघटित राहणे ही बदलत्या काळाची गरज प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी केले.
 
 
ज्येष्ठानंचे जिवन आनंददायी करण्यासाठी तालुका व गाव पातळीवर ज्येष्ठ नागरिक मंडळ स्थापन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, गावपातळीवर निर्माण करण्यात आलेल्या मंडळाना ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानशी संलग्न केल्यास दैनंदिन अडीअडचणी सोडविण्यापासून तर ज्येष्ठांची सहल, मनोरंजनाचे कार्यक्रम, वैद्यकीय उपचार व शासकीय योजना अशा विविध गोष्टींचा लाभ त्यांना देता येईल असे डॉ. राजू मिश्रा यांनी सांगितले.
 
 
हिंगणघाट समुद्रपूर तालुका संयोजक डॉ.विजय पर्बत यांनी माजी खा. दत्ता मेघे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यत करत सामाजिक सेवा करताना मेघे यांनी विशेष प्रेम व आशीर्वाद दिले. त्यांच्या आशीर्वादामुळेच आपण समाजकारणातून राजकारणात येऊ शकलो. समाज सेवेचे व्रत घेऊनच पुढे ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून समजसेवेचा वसा पुढे निरंतर सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असताना ज्येष्ठ नागरिक व निराश्रीत निराधार लोकांसाठी नि:शुल्क वृद्धाश्रम सुरू केले असल्याचे ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूरतर्फे नागरिक सेवा यात्री बस सुरू करावी या हेतूने देवस्थानला एक बस भेट द्यावी अशी मागणी करण्यात आली.