नागपूर,
Ramakrishna Wagh College छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टाविद्यार्थी संवाद’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून यशवंत शितोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “करिअर निवडताना आपल्या आवडी आणि क्षमतेला प्राधान्य द्यावे; कौशल्य आणि आत्मविश्वास हाच यशाचा पाया आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. मारोती वाघ होते. संस्थेच्या संचालिका लता वाघ, प्राचार्य प्रा. पंकज झगडे, तसेच विविध विभाग प्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते. Ramakrishna Wagh College प्रास्ताविक प्रा. सायली लाखे पिदळी यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. पायल मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सोनम वर्षेकर हिने केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
सौजन्य: सायली लाखे पिदळी, संपर्क मित्र