- नागरिकांच्या डेटाला व व्हॉट्सअॅप खात्यांना धोका
दिनांक :09-Nov-2025
Total Views |
विधी शर्मा
नागपूर,
cyber-trap-of-rto-e-challan-on-whatsapp हल्ली पुन्हा एकदा सायबर फसवणुकीची नवी लाट उसळली आहे. यावेळी “आरटीओ ई-चलान” या नावाने एक बनावट अँड्रॉइड अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅपवर फिरत असून, त्याद्वारे नागरिकांची वैयक्तिक माहिती आणि व्हॉट्सअॅप खाती धोक्यात येत आहेत. हा फसवणुकीचा प्रकार “आरटीओ” किंवा “एम.परीवाहन” या अधिकृत सरकारी अॅपसारखा भासवून लोकांना भ्रमित करतो. ओळखीच्या व्यक्तीकडून आलेला असल्याने अनेकजण फाइलवर क्लिक करतात आणि अनवधानाने मालवेअर आपल्या फोनमध्ये डाउनलोड करतात. सायबर तज्ञांच्या माहितीनुसार, हे बनावट अॅप इन्स्टॉल होताच हॅकर्सना फोनमधील वैयक्तिक माहिती, बँकिंग डेटा आणि सोशल मीडिया खात्यांवर प्रवेश मिळतो. त्यानंतर हेच अॅप संक्रमित फाइल आपोआप इतर संपर्कांना पाठवते, त्यामुळे फसवणुकीचा विस्तार झपाट्याने होतो. काही पीडितांनी सांगितले की, या अॅपमुळे त्यांचे मोबाईल पूर्णपणे हॅक झाले आणि व्हॉट्सअॅप खाते तात्पुरते बंद झाले.
नागपूर शहरात व्हॉट्सअॅप द्वारे 'आरटीओ ई-चलान' च्या नावाने फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी नोंदविण्यात आल्या. यावर सायबर सुरक्षा पथकातर्फे तातडीने ऍक्शन घेत या तक्रारींचे निवारण देखील करण्यात आले आहेत. cyber-trap-of-rto-e-challan-on-whatsapp नागरिकांनी व्हॉट्सअॅप किंवा कुठलेही सोशल मीडिया हाताळताना अधिक सतर्कता बागडावी. कुठल्याही संशयास्पद लिंकवर क्लीक करू नये. तो नंबर लगेच ब्लॉक करावे. डिजिटल युगात फसवणूक करणारे अधिक सक्रिय झाले आहेत. त्यामुळे सतर्कता, पडताळणी आणि नियमित सुरक्षा अपडेट ठेवणे अत्यावश्यक आहे.
- बळीराम सुतार, वरिष्ठ निरीक्षक, सायबर सेल, नागपूर