दारव्हा,
darva-cold : शहरासह तालुक्यातील वातावरणात चांगलाच बदल होत आहे. दोन-तीन दिवसांत किमान तापमानात सेल्सिअसची मोठी घट झाली आहे. यामुळे शहरासह तालुक्यातही थंडीच्या आगमनाची चाहूल लागली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून शहरासह तालुक्यात थंडीची चाहूल लागली आहे. वातावरणातील बदलामुळे अवघ्या तीन दिवसांत किमान पारा काही अंशांनी खाली आला असून दारव्हेकरांना पहाटे आणि रात्री आल्हाददायक गारवा अनुभवता येत आहे. दरवेळेस दिवाळीतच गारवा अनुभवायला मिळतो. परंतु, यावर्षी दिवाळीनंतर तो गारवा अनुभवण्यास मिळत आहे. एकीकडे हवेत गारवा तर दुसरीकडे न. प. निवडणुकीची गरम हवा सुरू आहे. हा दोन्ही प्रकारचा अनुभव नागरिक घेत आहेत.