धारणी गारठले, तापमान ११ डिग्री सेल्सियस

मध्य प्रदेशातून शीतलहर मेळघाटात

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
धारणी, 
dharani-is-freezing : ८ व ९ नोव्हेंबर म्हणजे थंडीचे प्रथम दोन दिवस. पावसाळा व उन्हाळा अचानक बेपत्ता होताच मध्य प्रदेशातून थंड वार्‍याने मेळघाटात दस्तक देऊन जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. रविवार सकाळी न्यूनतम तापमान ११ डिग्री सेल्सियस नोंदविल्या गेल्याने लवकरच शीतलहर कहर करण्याचे संकेत मिळालेले आहेत.
 

dharani-is-freezing 
 
मध्य प्रदेशातील इन्दौर, खंडवा आणि बर्‍हाणपूर या शहरांकडून धारणीत थंड हवेने शिरकाव करताच मेळघाटला थंडीचा फटका बसलेला आहे. थंडी सुरू झाल्याने शेतकरी मात्र सुखावलेला आहे. कारण आता अवकाळी पावसाचा धोका होण्याची चिंता नाही. रब्बी पिकाची पेरणी आता आटोपली असून खरीप पिके गमावलेल्यांना हरभरा, ऊस, गहू आणि तूर पिकाची आस लागलेली आहे. दोन दिवस तापमान एकदम उतरल्याने धारणी गारठलेले आहे. मात्र, राजकीय तापमान सतत वाढत आहे.