पुण्याई वृद्धाश्रमात औषधी व फळांचे वितरण

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Pune old age home ओंकारनगर, मानेवाडा रोड येथील भारतीय आदिम जाती सेवक संघ, विदर्भ यांच्या वतीने संचालित पुण्याई वृद्धाश्रमात पुलक जन चेतना मंच, महाल शाखेच्या वतीने औषध व फळे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या विविध औषधांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये ब्लड प्रेशर, ब्लड थिनर, मल्टीव्हिटामिन, कॅल्शियम, पेन रिलीव्हर स्प्रे, बीपी आणि खोकल्याचे सिरप, वातनाशक आयुर्वेदिक तेल, सर्दी व सर्वसाधारण औषधे यांचा समावेश होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या औषधांचा तीन महिन्यांचा पुरवठा करण्यात आला.

nagpur
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याई वृद्धाश्रमाच्या संचालिका खोब्रागडे होत्या. विशेष अतिथी म्हणून कार्यक्रमाचे पुण्यार्जक डॉ. मीनाक्षी प्रफुल्ल रोडे आणि संयोजक प्रफुल्ल रोडे उपस्थित होते. Pune old age home कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच, झोन ६ च्या संघटन मंत्री व शाखा अध्यक्षा सविता मांडवगडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अध्यक्ष राजेंद्र सोनटवके यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रवक्ता डॉ. दीपक शेंडेकर यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी संयोजक डॉ. जितेंद्र गडेकर व महामंत्री मनोज मांडवगडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला डॉ. चंद्रनाथ भागवतकर, तुषार नखाते, किशोर कहाते, प्रशांत कहाते, डॉ. मिलिंद वाचनकर, डॉ. तन्वी नखाते, भाग्यश्री नखाते, विजया भागवतकर, प्रीती पळसापुरे, रोशनी मोहळ, अनिता श्रावणे, आरती पळसापुरे, शुभांगी विटाळकर, स्मिता क्षीरसागर आदी सदस्य ड्रेसकोडसह उपस्थित होते.
सौजन्य: दीपक शेंडेकर, संपर्क मित्र