गोंदिया,
interstate-burglaries जिल्ह्यासह शेजारच्या मध्यप्रदेश राज्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ३.२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. प्राप्त माहितीनुसार ५ ऑक्टोबर २०२५ रोजी दवणीवाडा पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या धापेवाडा येथे ओमचंद रामचंद गौतम (५९) हे कुंटुंबीयांसह बाहेरगावी गेले असता दुपारी ४ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरांनी त्यांचा घराच्या दाराचे कुलूप तोडुन बेडरुमधील कपाटात ठेवलेले ३ लाख २४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचे उघडकीस आले होते.

याप्रकरणी ओमचंद गौतम यांच्या तक्रारीवरुन दवनीवाडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. दरम्यान, गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपविण्यात आले. तपासादरम्यान आरोपी कुंदन उत्तम बनोठे (२७) रा. बगदरा, जि. बालाघाट (म.प्र.) याने सदरची चोरी केल्याचे व तो मध्यप्रदेश राज्यातील नवेगाव पोलिसांच्या ताब्यात असल्याचे कळले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला प्रोडुस वांरटची प्रक्रीया करुन ७ नोव्हेंबर २०२५ रोजी ताब्यात घेतले. interstate-burglaries चौकशीदरम्यान त्याने सदर चोरी केल्याचे कबुल केले. यावेळी, पथकाने त्याचेकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केले. पुढील तपास दवनीवाडा पोलिस करीत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, पोलिस हवालदार रियाज शेख, प्रकाश गायधने, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, चालक पोलिस शिपाई राम खंडारे तसेच दवनीवाडाच्या पोलिस निरीक्षक वैशाली ढाले, सहायक पोलिस निरीक्षक संजयकुमार टेकाम, पोलिस हवालदार मिलकीराम पटले, धनेश्वर पिपरेवार, टेंभेकर यांनी केली.