पद्मनाभस्वामी मंदिरातून हरवलेले सोने सापडले

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
तिरुवनंतपुरम, 
padmanabhaswamy-temple केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे स्थित प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरातून सोने गायब झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. मात्र, मंदिरातून गायब झालेले सोने नंतर पुन्हा मंदिराच्या आवारातच सापडले. तरीदेखील मंदिर प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली, आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली.
 
 
padmanabhaswamy-temple
 
चौकशीत असे समोर आले की, जेव्हा गर्भगृहाच्या दरवाज्यावरील सोन्याचे पत्रे लावण्यासाठी स्ट्राँग रूममधून सोन्याचे नाणे बाहेर काढण्यात आले होते, त्या वेळी मंदिरातील CCTV कॅमेरे कार्यरत नव्हते. तपासादरम्यान फोर्ट पोलिसांनी तिरुवनंतपुरम न्यायिक प्रथम श्रेणी दंडाधिकारी न्यायालयाकडे सहा मंदिर कर्मचाऱ्यांवर पॉलीग्राफ (लाय डिटेक्टर) चाचणी करण्याची परवानगी मागितली होती. आता न्यायालयाने ही मागणी मंजूर केली आहे. padmanabhaswamy-temple पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, ही घटना चोरीचा प्रयत्न होती की निष्काळजीपणाचा परिणाम, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जरी पॉलीग्राफ चाचणीचे निकाल न्यायालयात पुराव्याच्या स्वरूपात ग्राह्य धरले जात नसले तरी, या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांच्या जबाबांमधील विसंगती ओळखण्यास आणि प्रकरण उकलण्यास मदत होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.
 
मंदिर प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार, या वर्षी ७ ते १० मे दरम्यान गर्भगृहाच्या दरवाज्याला सोन्याचे पत्रे लावण्यासाठी सुमारे १०७ ग्रॅम वजनाचे १३ सोन्याचे नाणे स्ट्राँग रूममधून काढण्यात आले होते. padmanabhaswamy-temple मात्र ही नाणी काही काळ गायब झाली होती. नंतर सर्व नाणी मंदिराच्या परिसरातच आढळली. श्री पद्मनाभस्वामी मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते. हे भगवान विष्णूंना अर्पण केलेले मंदिर असून, त्यात भगवान विष्णू शेषनागावर विसावलेल्या अवस्थेत विराजमान आहेत. केरळ आणि द्रविड वास्तुशैलीचे अप्रतिम उदाहरण म्हणून या मंदिराला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.