वर्धा,
wardha-congress-mayor-corporator : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठीची लढाई सुरू झाली आहे. भाजपाने गेल्या दोन दिवसात नगराध्यक्ष, नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उरकवल्या तर आज रविवार ९ राोजी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

काँग्रेस जिल्हा प्रभारी राजेंद्र मुळूक, प्रदेश उपाध्यक्ष रणजित कांबळे, प्रदेश सरचिटणीस अनंत मोहोड, प्रदेश सचिव डॉ. अभ्युदय मेघे, शैलेश अग्रवाल आणि माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे यांनी इच्छुक काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, देवळी विधानसभा प्रभारी सुरेश भोयर, हिंगणघाट प्रभारी संजय वानखेडे, वर्धा प्रभारी अतुल कोटेचा, आर्वी विधानसभा प्रभारी अनिल गायकवाड, प्रदेश महिला उपाध्यक्ष हेमलता मेघे आणि महिला जिल्हाध्यक्ष अरुणा धोटे उपस्थित होते. मुलाखत प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. अशिरा मिळालेल्या माहितीनुसार, आज जिल्ह्यातील सहाही नगर पालिकांच्या नगराध्यक्षपदाकरिता १७ जणांनी तर नगरसेवकपदाकरिता ३२० जणांनी मुलाखती दिल्या. यात नगराध्यक्षपदाकरिता वधार्ं व आर्वी येथे प्रत्येकी ३, हिंगणघाट आणि पुलगाव येथे प्रत्येकी ४, देवळी येथे २ तर सिंदी रेल्वे येथे एकाच उमेदवाराने मुलाखत दिली. वर्धेत गेल्या निवडणुकीत अपक्ष लढून दुसर्या क्रमांकाची मतं देणारे सुधीर पांगुळ, प्रसिद्ध नेत्र तज्ज्ञ डॉ. विनोद अदलखीया आणि महेश तेलरांधे यांनी मुलाखत दिली.