विद्यार्थ्यांची बस 150 फूट खोल दरीत कोसळली, 1 मृत, अनेक जखमी

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
नंदुरबार,
school bus falls into a valley : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा-मोलगीला जोडणाऱ्या देवगोई घाट परिसरात एका भयंकर अपघाताची घटना घडली. विद्यार्थी भरलेली स्कूल बस अंदाजे 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली आहे. या बसमध्ये साधारण 20 ते 30 विद्यार्थी प्रवास करत होते.
 
 
BUS ACCIDENT
 
 
 
प्राथमिक माहिती नुसार, या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, अनेक विद्यार्थी जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले आणि जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र प्राथमिक अंदाजानुसार बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला असावा. बस पूर्णपणे धोकादायक स्थितीत चक्काचूर झाली आहे.
 
माहिती नुसार, अपघातातले विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे आश्रम शाळेचे होते. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यामुळे शाळेच्या दोन बस विद्यार्थ्यांना घेऊन आल्या होत्या, त्यातील एका बसचा हा भीषण अपघात झाला. दोन ते तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती समोर आली आहे.