नागपूर,
pcems-2025-conference-at-vnit विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी), नागपूर येथे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाच्या वतीने आयोजित “पॅराडाइम शिफ्ट्स इन कम्युनिकेशन, एम्बेडेड सिस्टीम्स, मशीन लर्निंग अँड सिग्नल प्रोसेसिंग ( पीसीईएमएस )” या चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी झाला. या दोन दिवसीय परिषदेला देश-विदेशातील संशोधक, वैज्ञानिक आणि उद्योगतज्ज्ञांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
परिषदेत २९६ संशोधन निबंध सादर झाले असून, त्यापैकी १२५ उच्च दर्जाचे पेपर १६ विषयक सत्रांमध्ये सादर करण्यात आले. आयईईई महाराष्ट्र सेक्शनच्या सहकार्याने आयोजित या परिषदेत डॉ. पी. हनुमंथा राव (समीर), प्रा. ए. एन. राजगोपालन (आयआयटी मद्रास), प्रा. सुमंत्र दत्ता रॉय (आयआयटी दिल्ली), प्रा. राजेश हेडगे (आयआयटी कानपूर), तसेच इस्रो, डीआरडीओ आणि मॅथवर्क्स सारख्या संस्थांचे तज्ज्ञ वक्ते सहभागी झाले. समारोप समारंभाला डॉ. ज्ञान प्रकाश सिंग, संचालक (कार्यभार), व्हीएनआयटी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्रीनिवास कुचिपुडी (डीआरडीओ ) तर सन्माननीय अतिथी डॉ. जेरेमी ब्लम (पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरिका) उपस्थित होते. pcems-2025-conference-at-vnit या वेळी १५ उद्योग प्रतिनिधी आणि १२ शैक्षणिक सहभागींचा सत्कार करण्यात आला. ‘विजेश्वरय्या सर्वोत्तम पेपर पुरस्कार’ आयआयआयटी नागपूर येथील डॉ. स्वाती हिरा यांना “वैद्यकीय प्रतिमा संश्लेषणासाठी कंटूर मार्गदर्शित प्रसार” या संशोधनासाठी प्रदान करण्यात आला. त्याच पेपरला महिला संशोधक सर्वोत्तम पेपर हा पुरस्कारही मिळाला. या परिषदेतील निवडक संशोधन पेपर स्प्रिंगरच्या इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मधील व्याख्यान नोट्स मालिकेत प्रसिद्ध होणार आहेत. परिषदेसोबत आयोजित इंडस्ट्री एक्स्पो मध्ये मॅथवर्क्स, अँसिस, सायंटेक, स्पाराट्सॉफ्ट आदी कंपन्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले. ‘पीसीईएमएस’ ही परिषद व्हीएनआयटीच्या संशोधन, नवोन्मेष आणि उद्योग सहकार्यातील नवी दिशा ठरली.