रायगड जिल्ह्यातील काशीद बीच येथे अकोल्याच्या दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू

मृतकामध्ये शिक्षक व विद्यार्थ्याचा समावेश

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
अकोला,
people-from-akola-drowned-in-sea येथील शुअर विन क्लासेसचे १२ विद्यार्थी व ३ शिक्षक असे १५ जण पर्यटन नासाठी रायगड जिल्ह्यातील काशिद बीच येथे गेले होते. त्यातील दोन विद्यार्थी व एक शिक्षक असे पाण्यात बुडाले. त्यापैकी एक विद्यार्थी आणि क्लासचे संचालक शिक्षक असे दोघेजण मृत झाले तर एक विद्यार्थी सुखरूप आहे, अशी माहिती रायगड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून अकोल्याच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कार्यालयाला शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाली.
 
people-from-akola-drowned-in-sea
 
राम कुटे (वय ६०, रा. सुधीर कॉलनी, जवाहरनगर, अकोला) असे मृत शिक्षकाचे तर आयुष रामटेके (वय १९, अकोला) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. राम कुटे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बोर्ली तर आयुष रामटेकेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरुड प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. people-from-akola-drowned-in-sea दरम्यान, आयुष बोबडे (वय १७)हा विद्यार्थी सुखरूप आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी दिली.दरम्यान, राम कुटे यांचा अकोल्यातील बारा ज्योर्तिलिंग परिसरात शुअर विन क्लास होता. त्यानंतर त्यांनी तोष्णीवाल ले-आऊट परिसरात क्लास सुरु केला होता. त्याची शाखा बुलडाण्यातही सुरु केली होती. कुटे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे.