शहरात पिस्तूल विक्री करणाऱ्या टाेळ्या सक्रिय

- पिस्तूलसह दाेघांना अटक, एक फरार

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
pistol-sales-gangs-active : गेल्या काही महिन्यांपासून शहरात पिस्तूल विक्री करणाèया टाेळ्या सक्रिय झाल्या असून मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि छत्तीसगढवरुन पिस्तूलांची तस्करी हाेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने एका टाेळीला अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एक पिस्तूल, मॅग्झीन आणि गाेळ्या जप्त केल्या. ही कारवाई शनिवारी रात्री आठ वाजता बेसामध्ये केली. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांना पिस्तूल पुरविणाèया टाेळ्यांची लिंक पाेलिसांच्या हाती लागली आहे. अर्श आशिक रसूल सय्यद (32), रा. राजाराम नगर, चिंच भवन आणि करण दुर्गाप्रसाद हिंगे (23), रा. नवीन बिडीपेठ अशी अटकेतील आराेपींची नावे असून टाेळीचा म्हाेरक्या शेख माेहसीन उफर् बाबा शेख मुसा हा फरार आहे.
 
 
 
k
 
 
 
शहरातील अनेक गुन्ह्यात पिस्तूलातून गाेळीबार केल्याच्या घटना समाेर आल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांच्या टाेळ्यांकडे पिस्तूल असणे हे काही नवीन नाही. नागपुरातील काही गुन्हेगार पिस्तूल पुरविणाèया टाेळ्यांकडून पिस्तूल विकत घेऊन शहरात बंदुकीच्या जाेरावर दहशत पसरविण्याचे काम करीत असतात. गुन्हेगारांना पिस्तूल पुरविण्यासाठी विशेष साखळी काम करीत असते. त्या साखळीच्या माध्यमातून परराज्यातून आलेल्या पिस्तुलांची विक्री करण्यात येते.
 
 
 
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषनगरातील टी पाॅईंटकडून स्कूल ऑफ स्काॅलर्सकडे जाणाèया रस्त्यावर दाेन गुन्हेगारांकडे पिस्तूल असल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक महेश सागडे यांना मिळाली. त्यांनी लगेच पथकातील सहायक निरीक्षक गजानन चांभारे, महेंद्र सडमाके, राजेश तिवारी, कमलेश गहलाेत आणि संताेष चाैधरी यांनी सापळा रचण्याचे आदेश दिले. सापळा रचल्यानंतर संशयाच्या आधारावर पाेलिसांनी दाेघांना ताब्यात घेऊन झडती घेतली. त्यांच्या बॅगमध्ये पाेलिसांना जिवंत काडतूसासह एक पिस्तूल सापडली.
 
 
अर्श आशिक रसूल सय्यद (32), रा. राजाराम नगर, चिंचभवन आणि करण दुर्गाप्रसाद हिंगे(23), रा. नवीन बिडीपेठ, सक्करदरा अशी पिस्तूल घेऊन िफरणाèया दाेघांची नावे आहेत. या दाेघांना पिस्तूल पुरवणारा शेख माेहसीन उफर् बाबा शेख मुसा( मानकापूर) हा आराेपी सध्या फरार आहे. पाेलिस त्याचा शाेध घेत आहेत. मनिषनगरात दाेन जण शस्त्र घेऊन िफरत असल्याचा सुगावा पाेलिसांना लागला हाेता. संशय आल्यानंतर झडती घेऊन त्यांची बॅग तपासली असता पाेलिसांना मॅग्झीन असलेले पिस्तूल आणि काडतूस सापडले. भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत गुन्हे शाखा पथकाने दाेघांनाही पुढील कायदेशीर कारवाईसाठी बेलतराेडी पाेलिसांच्या स्वाधिन केले.