पुलगावातील शेकडो मुस्लिमांचा भाजपात प्रवेश

* दाखवला आ. बकानेंवर विश्वास

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
पुलगाव, 
pulgaon-muslims-join-bjp : पुलगाव शहरातील गारूडी मोहल्ला परिसरातील शेकडो मुस्लिमांनी एकमताने भारतीय जनता पार्टीला विजयी करण्याचा निर्धार व्यत करत आमदार राजेश बकाने यांच्या आ. राजेश बकाने यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला.
 
 
k
 
या प्रसंगी सय्यद जब्बार, सय्यद नझुरुद्दीन, सय्यद रमजान, सय्यद जावेद, सय्यद युसुफ, सय्यद गनी, सय्यद कादिर, सय्यद रासिक, सय्यद शाहरुख, सय्यद नझीर, सय्यद नझीम, सय्यद फिरोजभाई, रुसतम खान, सय्यद मकबूल, सय्यद अफझल, सय्यद सिकंदर, सय्यद सदीक, सय्यद युनूस आदींनी भाजपामध्ये प्रवेश घेतला.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देश-राज्याच्या विकासासाठी केलेल्या कार्याने आम्ही प्रेरीत झालो आहोत. आ. राजेश बकाने यांनी देवळी-पुलगाव मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरू केले आहे. त्यांच्या हातातच या शहराचा आणि समाजाचा खरा विकास सुरक्षित असल्यानेच आम्ही भाजपात प्रवेश घेत असल्याचे मुस्लिम नेत्यांनी यावेळी सांगितले.
 
 
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, पुलगाव शहराध्यक्ष प्रशांत इंगोले, नितीन बडगे, माधुरी इंगळे, शरद सावरकर, मंगेश झाडे, आशिष गांधी, संतोष तिवारी, गुंजन चव्हाण, महेंद्र मार्कंड, विजय निवल, राजेश गुप्ता, रिचर्ड क्रॉस आदी उपस्थित होते.
 
 
यावेळी आ. बकाने म्हणाले की, भाजपा हा सर्व समाजघटकांना न्याय देणारा आणि विकासाच्या केंद्रस्थानी ठेवणारा पक्ष आहे. पुलगावातील गारूडी मोहल्ल्याने दाखवलेला विश्वास समाजाच्या ऐयाचे आणि विकासाच्या राजकारणाचे प्रतीक आहे. सर्व धर्म, सर्व समाज एकत्र येऊन देवळी-पुलगाव मतदारसंघाला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचे हे सशत पाऊल असल्याचे ते म्हणाले.