तभा वृत्तसेवा
पुसद,
lalla-dinde : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुसद शहरात भारतीय जनता पार्टीच्या शक्ती प्रदर्शनासारखा भव्य युवा पक्षप्रवेश सोहळा योग भवनात पार पडला. लल्ला उर्फ भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री राधेश्याम दिंडे यांच्या नेतृत्वात पुसद शहर आणि ग्रामीण भागातील 245 उत्साही युवकांनी भाजपामध्ये प्रवेश करून पक्षाच्या विजयाच्या संकल्पास बळ दिले.
हा भव्य प्रवेश सोहळा भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या अध्यक्षतेत पार पडला. प्रमुख उपस्थिती पुसद जिल्हा निवडणूक प्रमुख माजी आमदार नीलय नाईक यांची होती. तसेच ज्येष्ठ नेते विनोद जिल्हेवार, माजी जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे, जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, शेखर वानखेडे, रोहित वर्मा, निलेश पेन्शनवार, निखिल चिद्दरवार, विश्वास भवरे, आदित्य माने, अमेय नाईक, दीपाली जाधव, अनिरुद्ध पाटील, रूपाली जयस्वाल, बळवंत नाईक, रेशमा लोखंडे, अरुणा जाधव, अश्विन जयस्वाल इत्यादी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना नीलय नाईक म्हणाले, लल्ला दिंडे यांच्या नेतृत्वात झालेला हा युवा महाप्रवेश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जि.प., पं.स. आणि नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. जिल्हा समन्वयक नितीन भुतडा आपल्या जोशपूर्ण भाषणात म्हणाले, लोहे को काटने के लिये लोहा चाहिये. लल्ला दिंडे यांचा पक्षप्रवेश हीच ती ताकद आहे जी विरोधकांना धडा शिकवेल. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा युवा मोर्चा पदाधिकाèयांना नियुक्ती पत्राचे वितरण सुद्धा करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान ‘अबकी बार भाजपा सरकार’ या घोषणा देत युवकांनी परिसर दणाणून सोडला. उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केले की, या भव्य युवा महाप्रवेशामुळे भाजपाची ताकद आता पुसदमध्ये द्विगुणित झाली आहे आणि विरोधकांच्या गोटात स्पष्टपणे अस्वस्थता निर्माण झाली आहे. कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश शिंदे (जिल्हा महामंत्री, किसान मोर्चा) यांनी कुशलतेने केले, तर आभारप्रदर्शन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित वर्मा यांनी केले.
या कार्यक्रमाला ओबीसी नेते शेखर वानखेडे, गुरू उंचाडे, नितीन वारकड, कपिल जाधव, पवन राठोड, निहाल वानखेडे, राजू काकडे, सुधीर धाड, अंकुश राठोड, अक्षय पांडव, निखिल राठोड, शिव हुलकाने, आकाश दिंडे, विशाल कवडे, मुन्ना राठोड, आकाश मारकड आणि शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.