सक्षम नागपूरचा दिवाळी मिलन सोहळा

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Saksham Nagpur समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम) नागपूरतर्फे दिवाळी मिलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात अध्यक्ष डॉ. मिलिंद हरदास यांच्या हस्ते पूजा करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
 
Nagpur
  
या वेळी ‘दिव्यरंग दिव्यांगांचे’ या विशेष उपक्रमांतर्गत विविध दिव्यांग कलावंतांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. गाण्यांचे सादरीकरण, सुरेख सूत्रसंचालन आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसर भावनांनी दुमदुमला. दिव्यांग कलाकारांच्या जिद्द, त्यांच्या पालकांच्या प्रयत्नांचे कौतुक उपस्थित मान्यवरांनी केले. Saksham Nagpur सक्षम नागपूर, समाज कल्याण विभाग, कर्मशाळा आणि दिव्यरंग दिव्यांगांचे या सर्व संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांनी कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमात सक्षमचे कलाकार, पालक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. अखेरीस सर्वांनी एकत्र येऊन आनंद, सकारात्मकता आणि एकात्मतेचा संदेश दिला.
सौजन्य: विजय दाणी, संपर्क मित्र