शिरुड तलावावर निसर्गसाथी फोरमचे पक्षीनिरीक्षण

* ५० नवीन पक्षांची झाली नोंद

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
हिंगणघाट, 
shirud-lake : भारतीय पक्षी तज्ज्ञ डॉ. सलीम अली व अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिवसानिमित्ताने साजरा करण्यात येणार्‍या पक्षीसप्ताहाच्या निमित्ताने निसर्गसाथी फोरम, हिंगणघाट आणि संजय गांधी विद्या विहार, वणी (छोटी) यांच्या संयुत वतीने शनिवार ८ रोजी पक्षीनिरीक्षण शिरुड तलावावर करण्यात आले.
 
 
 
kl
 
 
 
या पक्षीनिरीक्षण उपक्रमास संजय गांधी मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष के. के. वाघमारे, सचिव वैशाली वनीकर यांनी शुभेच्छा दिल्या. यात बहार नेचर फौंडेशन, वर्धेचे दर्शन दुधाने प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. देशी विदेशी अशा दोन्ही प्रकारच्या ५० पक्षांची नोंद घेण्यात आली. दुधाने यांनी पक्षांचे स्थलांतर कसे होते? नावावरून पक्षी कसे ओळखता येतात? तसेच पक्षांना स्थलांतर का करावे लागते? युरोपियन देशातून ३५ हजार किमीचा प्रवास पक्षी कसे करू शकतात? याविषयी माहिती दिली. पक्षी सप्ताह साजरा करण्यासाठी शासनासमोर आग्रह धरणारे व त्यासाठी शासनाच्या अध्यादेश काढून घेणारे असे व्यक्तिमत्व दर्शन दुधाने या झालेल्या पक्षी निरीक्षणाला मिळाले हे आजच्या कार्यक्रमाची विशेषतः होती. पक्षांना निवारा देण्याचं, त्यांच्या प्रजननाला मदत करण्याचं काम झाड कशी करतात याची माहिती डॉ. बालाजी राजूरकर यांनी देऊन काटेरी झाडे पक्षी घरट्यासाठी का निवडतात यांची प्रत्यक्ष घरटे दाखवून माहिती दिली.
 
 
डॉ. सलीम अली व्यक्ती व कार्य याविषयी मार्गदर्शन नियाझुद्दीन सिद्दीकी यांनी दिले. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे विषयी निसर्गाचा सखा या कवितेच्या माध्यमातून डॉ. बालाजी राजूरकर यांनी माहिती दिली. मनोगत तर यशवंत गडवार, वासुदेव पडवे यांनी प्रास्ताविक मुख्याध्यापक गुणवंत ठाकरे यांनी केले. संचालन प्रभाकर कोळसे तर आभार चेतन गावंडे, राकेश झाडे यांनी मानले.
 
 
या पक्षी निरीक्षणात संजय विद्या विहार वणी (लहान)च्या २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना डॉ. बालाजी राजूरकर लिखित काव्यसंग्रह मनोवेध याच्या प्रती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पक्षी निरीक्षण सहलीमध्ये शिरुड डॅम येथे शिकाटा, किंगफिशर ग्रीन बिटर (वेडा राघू), मोठा बगळा, लिटिल ग्रेट, कॉमन पोछाड, नादर्न प्रिंटेल, गढवाल, कॉमन पोछाई, बार हेडेड ग्रील, कार्डिंग पट्टा कदम, लिटिल स्विफ्ट, खंड्या, बाण शालो, ब्राह्मणी आदी पक्षी निरीक्षणातून पाहण्यास मिळाले.