नागपूर,
tiger viral video truth : दोनच दिवसांपूर्वी एका इसमाची शिकार करून वाघ त्याला घेऊन जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या एआय व्हिडीओवरून प्रचंड गदारोळ झाल्यानंतर वाघाने त्या माणसाला परत आणून सोडल्याचा व्हिडीओही सध्या सर्वत्र गाजत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ एआयचा असल्याची खात्री तर झालीच पण सोशल मीडियाच्या दबावाने वाघही दांदरला अशा मिश्लिक मिम्सचा पाऊस पडत आहे.

एआय नावाचा अतर्क्य प्रकार सध्या माणसाच्या कलात्मक विश्वात फारच विचित्र पद्धतीने शिरत आहे. त्यामुळे एखाद्या व्हिडीओत दाखविलेली बाब खरी आहे का अशी शंकाही येणार नाही इतही ती अस्सल वाटते. पण गेल्या आठवड्यातील गाजलेल्या दोन व्हिडीओंनी मनोरंजनासोबतच एआय आता काहीही करू शकते याची खात्री पटली. आठवडाभरापूर्वी समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात एक मद्यपी इसम महाकाय वाघाला रात्री भर रस्त्यात गोंजारत असल्याचे दिसत आहे. लगेच विविध वृत्तवाहिन्यांनी याची गंभीर दखल घेत बातम्या प्रसिद्ध केल्या. हा माणूस वाघाचे दारूच्या नशेत लाड करीत असावा असे प्रथमदर्शनी सर्वांना वाटत होते. विशेष म्हणजे वाघ त्याला काहीच करीत नाही आहे याचेही आश्चर्य वाटत होते. पण एकाच दिवसात हा व्हिडीओ एआयने तयार केल्याचे निष्पन्न झाले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
हा उधळलेला वारू शांता होत नाही तोच दोनच दिवसांपूर्वी एक अजस्त्र वाघ रात्राला एका इसमाला पकडून फरफटत नेत असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला. आधीच्या अनुभवामुळे हा देखील एआयने तयार केला असेल अशी नेटकèयांना शंका होतील. विशेष म्हणजे ज्याने हा व्हिडीओ तयार केला त्याने हाच वाघ त्या इसमाला परत आणून सोडत असल्याचा व्हिडीओ तयार केला. तोही समाजमाध्यमावर आता प्रचंड पाहिल्या जात आहे. यामुळे सर्वांना सुखद धक्का बसला असून सोशल मीडियाच्या दबावाने वाघही दांदरला आणि त्याने या इसमाला सुखरूप आणून सोडल्याच्या कमेंट आणि मिम्स व्हायरल होत आहे. ए भाऊ तुले आणून सोडलं बावा ही वैदर्भीय मिम्सही सर्वांना हसून सोडत आहे.
भेदरलेल्या इसमाला पाणीही पाजले
या वाघाने त्या माणसाला परत आणून तर सोडलेच पण त्याला पाणीही दिले असे दाखविण्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे एआयच्या मदतीने लोक काय काय करतील याचा अंदाचच घेता येत नसल्याचे बोलले जात आहे.