सोमलवाडा भागात तुळशी विवाह सोहळा पारंपरिक उत्साहात

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Tulsi wedding ceremony पर्यावरण संरक्षण गतिविधी आणि कुटुंब प्रबोधन, सोमलवाडा भाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तरुण भारत’ च्या ‘तुळस लावू या, पर्यावरणाचे संरक्षण करू या’ या उपक्रमांतर्गत तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन पांडे लेआउट येथील स्व. दत्ता डिडोळकर सभागृहात करण्यात आले. तुळशी विवाह हा सनातन परंपरेचा पवित्र विधी असून, पर्यावरण संरक्षण आणि कुटुंब प्रबोधनाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.
 
tulasi vivah
 
यावेळी प्रमुख वक्त्या वैद्य रेणुका जांभोरकर यांनी तुळशीचे आयुर्वेदानुसार औषधी गुणधर्म, पर्यावरणीय आणि कौटुंबिक मूल्यांशी असलेले नाते स्पष्ट केले. कार्यक्रमाला सोमलवाडा भाग संघचालक श्रीकांत चितळे, पर्यावरण संयोजक नेता चिंचुळकर, कुटुंब प्रबोधन महानगर संयोजक मंगेश टोळ, पर्यावरण संयोजक नरेश हिवरखेडकर, भाग संयोजक नितीन मोहरील, नगर संघचालक अरविंद भुमराळकर आणि नगर संयोजक शंकर साठे आदी मान्यवर उपस्थित होते. Tulsi wedding ceremony कार्यक्रमाची सुरुवात पंचसूत्री गीताने झाली. पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर व दीपक कुळकर्णी यांच्या हस्ते पंचसूत्री मंगलाष्टकांसह तुळशी विवाह विधी पार पडला. त्यानंतर आरती, प्रसाद वितरण आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.
सौजन्य: सुधांशु दाणी, संपर्क मित्र